शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

coronavirus: साधू हत्याप्रकरणातील पीडितांच्या वकिलाचा मृत्यू, मेंढवण खिंडीत अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 02:24 IST

गडचिंचले हत्येप्रकरणात तीन निरपराध लोकांची बाजू मांडण्यासाठी बुधवारी डहाणू न्यायालयात विश्व हिंदू परिषदेच्या वतीने भार्इंदर येथील वकील दिग्विजय त्रिवेदी यांच्यासह त्यांचा मित्र कारने मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून डहाणूच्या दिशेने निघाले होते.

पालघर - पालघरच्या गडचिंचलेमध्ये झालेल्या साधू हत्याकांड प्रकरणी डहाणू न्यायालयात त्यांची बाजू मांडण्यासाठी निघालेल्या वकील दिग्विजय त्रिवेदी यांचे बुधवारी राज्य महामार्गावरील मेंढवन खिंडीत झालेल्या अपघातात निधन झाले.गडचिंचले हत्येप्रकरणात तीन निरपराध लोकांची बाजू मांडण्यासाठी बुधवारी डहाणू न्यायालयात विश्व हिंदू परिषदेच्या वतीने भार्इंदर येथील वकील दिग्विजय त्रिवेदी यांच्यासह त्यांचा मित्र कारने मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून डहाणूच्या दिशेने निघाले होते. त्यांच्या सोबत अन्य दोन कारमध्ये काही सहयोगीही होते. मनोर मस्तान नाका पार केल्यानंतर त्रिवेदी यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना ओव्हरटेक करून ते पुढे निघून गेले. ते डहाणूच्या आसपास पोहोचले असताना मागे असलेली कार दिसत नसल्याने त्यांनी मोबाइलवरून संपर्क साधला. मात्र संपर्क होत नसल्याने त्यांनी गाड्या माघारी वळवून प्रवास सुरू केला. मेंढवनच्या धोकादायक वळणावर कार उलटल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या घटनेत त्रिवेदी यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा सहकारी गंभीर जखमी झाल्याने त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.सहा आरोपींना १९ मेपर्यंत कोठडीया प्रकरणातील आरोपींची संख्या आता १४१ झाली आहे. गुरुवारी सहा नव्या आरोपींना न्यायालयाने १९ मेपर्यंत पोलीस कोठडी दिली. आधीच अटकेत असलेल्या १०६ जणांपैकी पाच जणांना १६ मेपर्यंत पोलीस कोठडी दिली. उर्वरित १०१ जणांना न्यायालयीन कोठडीत पाठविले आहे. तरी त्यातील ४० जणांना तिसºया गुन्ह्यात अटक केली असून त्यांना १८ मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. 

टॅग्स :Accidentअपघातpalgharपालघर