शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus वसई-नालासोपाऱ्यात गर्भवती महिलेसह दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 06:10 IST

ज्येष्ठ नागरिकाने गमावले प्राण

लोकमत न्यूज नेटवर्कवसई/नालासोपारा : वसईमधील एका कोरोनाग्रस्त ज्येष्ठ नागरिकाचा तसेच एका गर्भवती महिलेचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे पालघर जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या चार झाली असून वसई-नालासोपारामध्ये तीन जणांनी आपले प्राण गमावले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या १७ झाली आहे.नालासोपारा पूर्वेकडील एका ३८ वर्षीय गर्भवती महिलेला श्वसनाचा त्रास होत असल्याने तिला उपचारासाठी मुंबईच्या नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या महिलेचा ४ एप्रिल रोजी मृत्यू झाला होता. तिचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच वसईतील कोरोनाग्रस्त ज्येष्ठ नागरिक रुग्णाचा सोमवारी पहाटे मृत्यू झाला. वसईच्या ओमनगर भागात वास्तव्यास असलेल्या या ६५ वर्षीय रुग्णावर पाच दिवसांपासून नालासोपारास्थित एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र सोमवारी पहाटे त्यांचे निधन झाले. वसई-नालासोपारा परिसरात कोरोनाग्रस्त तीन रुग्णांचे बळी गेल्यामुळे आरोग्य यंत्रणा व पोलिसांच्या चिंतेत वाढ झाली आहे.सोमवारी मृत्यू पावलेला रुग्ण मुंबईत एका पंचतारांकित हॉटेलमध्ये काम करीत होता. त्याचे मुंबईत डायलिसीसही सुरू होते, परंतु लॉकडाऊननंतर त्या रुग्णाने नालासोपारा येथे डायलिसीस करण्याचे ठरविले. मात्र खबरदारी म्हणून या रुग्णांची कोविड-१९ ची वैद्यकीय तपासणी केली असता त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यानंतर दोन दिवसांपूर्वी या रुग्णाची प्रकृती बिघडली आणि सोमवारी पहाटे या रुग्णाचा हॉस्पिटलमध्येच मृत्यू झाल्याची माहिती महापौरांनी दिली.पालकमंत्री दादा भुसेंनी घेतली आढावा बैठकवसई, विरार, नालासोपारा परिसरात कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी सोमवारी दुपारी आढावा बैठक घेतली. पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात चार बळी गेल्यानंतर कोरोनाविषयी पहिलीच आढावा बैठक घेतली हे विशेष. या आढावा बैठकीदरम्यान त्यांनी वसई-विरार महापालिका प्रशासन व त्यांच्या आरोग्य यंत्रणेचे सर्व डॉक्टर व अधिकारीवर्ग यांची ही भेट घेऊन माहिती व उपाययोजना जाणून घेतल्या.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस