शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
3
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
4
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
5
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
6
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
7
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
8
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
9
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
10
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
11
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
12
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
13
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
14
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
15
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
16
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
17
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
18
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
19
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
20
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल

coronavirus: रुग्णांची गुजरात सीमेवर अडवणूक; गुजरात सरकारचे पत्र असेल तर सोडू, पोलिसांची भूमिका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 03:22 IST

सातपाटी येथील प्रणय तरे हा तरुण मोटारसायकल अपघातात जायबंदी झाल्यानंतर जिल्ह्यातील एका खासगी रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले.

पालघर : गुजरात राज्यातील रुग्णालयात सुरू असलेल्या उपचारासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून रीतसर परवानगी घेऊनही गुजरातच्या सीमेवर पोलिसांकडून रुग्णांची अडवणूक होत असल्याचे उघड झाले आहे. महाराष्ट्रातील जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र नाही, तर गुजरात सरकारचे पत्र असेल तरच आम्ही प्रवेश देऊ, असे सीमेवरील पोलीस सांगत आहेत. यामुळे स्वस्त व विनामूल्य सेवेच्या आशेने गुजरातमध्ये जाणाºया रुग्णांच्या जीवितास धोका पोहोचू शकतो.सातपाटी येथील प्रणय तरे हा तरुण मोटारसायकल अपघातात जायबंदी झाल्यानंतर जिल्ह्यातील एका खासगी रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. मात्र उपचारासाठी लाखो रुपयांचा खर्च येईल असे सांगण्यात आल्याने आणि घरची गरीब परिस्थिती असल्याने प्रणयच्या नातेवाइकांनी त्याला गुजरातमधील सुरत येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याच्यावर काही हजारांत शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर लॉकडाउनमुळे जिल्हाबंदी जाहीर केल्याने प्रणयला तपासणीसाठी जाता आले नाही. दरम्यानच्या काळात त्याचा त्रास वाढल्याने त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात रीतसर अर्ज करून परवानगी पत्र मिळविले. गुरुवारी एका रुग्णवाहिकेतून बहीण अक्षता मोरे हिच्यासह गुजरात येथे जात असताना महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील आच्छाड नाक्यावर तैनात गुजरात पोलिसांनी त्यांना अडवले. पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले परवानगीचे पत्र पोलिसांना दाखवून, आम्ही उपचारासाठी चाललो असल्याचे सांगूनही त्यांनी प्रवेश देण्यास नकार दिला. महाराष्ट्रातील जिल्हाधिकाºयांचे पत्र नाही, तर गुजरात सरकारचे पत्र असेल तरच आम्ही प्रवेश देऊ, असा पवित्रा त्यांनी घेतला. अनेक विनंत्या करूनही पोलीस ऐकत नसल्याने शेवटी अक्षता मोरे हिने उपस्थित डॉक्टरांच्या टीमला आपली कागदपत्रे दाखवली. शेवटी एक ते दोन तासांनी त्यांना सोडण्यात आले. त्यामुळे येथून गुजरात, सिल्वासा येथे उपचारासाठी जाणाºयांसाठी गुजरात प्रशासनाने जातीने लक्ष घालून आपल्या पोलिसांना सूचना देण्याची रुग्णांच्या नातेवाईकांची मागणी आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसVasai Virarवसई विरार