शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus News: चिंता वाढली! वसई-विरार शहरातील कोरोना बाधितांची संख्या 553वर पोहोचली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 21:01 IST

Coronavirus News: चिंताजनक म्हणजे नालासोपारा पूर्व भागातील 63 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, तर पालिका हद्दीत नालासोपारा, विरार पूर्व भागातून 5 जण कोरोनामुक्त झाल्याची माहिती पालिकेने दिली.

वसई :- वसई-विरार शहर महापालिका हद्दीत सोमवारी पुन्हा सर्वाधिक गुणाकार करीत 62 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून, धक्कादायक म्हणजे एकट्या वसई नायगावमध्ये 27 रुग्ण आढळून आले आहेत. चिंताजनक म्हणजे नालासोपारा पूर्व भागातील 63 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, तर पालिका हद्दीत नालासोपारा, विरार पूर्व भागातून 5 जण कोरोनामुक्त झाल्याची माहिती पालिकेने दिली.किंबहुना सोमवारी देखील दिवसभरात एकूण 62 रुग्णांची वाढती आकडेवारी आणि गंभीर म्हणजे हे सर्व रुग्ण बाधित रुग्णाच्या हायरिस्क संपर्कातील असल्याने यात सुरक्षारक्षक, बँक, अग्निशमन दल, प्लंम्बर, नर्स, दुकान चालक, वॉर्डबॉय, रुग्णालय कर्मचारी, पालिका कर्मचारी, पोलीस कर्मचारी, गरोदर महिला स्वच्छता कर्मचारी आदींचा समावेश असल्याने ही वाढती संख्या व होत असलेला गुणाकार पुन्हा शहराची चिंता वाढवणार आहे. त्यामुळे आता सोमवारी आढळून आलेल्या एकूण कोरोना बाधितांची संख्या आता थेट 553वर पोहोचली आहे.पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, आढळून आलेल्या एकूण रुग्णांमध्ये 39 पुरुष तर  23  महिलाचा समावेश आहे. यात वसईतील 4, 6  व 12 वर्षांच्या मुला-मुलीचा समावेश असून, वसईतील 17 पुरुष व 10 महिला आहेत. तर नायगावमधील 1 पुरुष व 3 महिला आहेत, नालासोपारातून 2 महिला व 12 पुरुष आहेत आणि विरारमधील 9 पुरुष व  8 महिला रुग्णाचा समावेश आहे. चिंताजनक म्हणजे पुन्हा एकदा नालासोपारा पूर्वेस 63 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे त्यामुळे आता एकूण मृत्यूची संख्या 19 वर पोहोचली आहे. या सर्व रुग्णांवर वसई, नालासोपारा व मुंबईत विविध रुग्णालयांत उपचार सुरू असून वसई-विरार हद्दीत एकूण उपचार घेत असलेल्या रुग्णाची एकूण संख्या 300 वर पोहचली आहे.वसई-विरार हद्दीत 5 जण कोरोनामुक्त!वसई-विरार महापालिका हद्दीत सोमवारी नालासोपारा पश्चिम  3 आणि विरार पश्चिममधून 2 असे एकूण 5 जण कोरोनामुक्त झाले असल्याने आता एकूण कोरोनामुक्त संख्या 234 झाली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस