CoronaVirus News : नालासोपाऱ्यात टॅक्सीवरून अंत्ययात्रा, पैसे नसल्याने नातेवाईकांनी शोधला पर्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 23:48 IST2020-06-24T23:47:37+5:302020-06-24T23:48:07+5:30
रुग्णवाहिकेने भरमसाट भाड्याची मागणी केल्याने पैसे नसल्याने मृताच्या नातेवाइकांवर टॅक्सीच्या टपावर तिरडी बांधून अंत्ययात्रा काढावी लागल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.

CoronaVirus News : नालासोपाऱ्यात टॅक्सीवरून अंत्ययात्रा, पैसे नसल्याने नातेवाईकांनी शोधला पर्याय
नालासोपारा : कोरोनाच्या महामारीत सुरू असलेली लूटही सध्या चर्चेचा विषय बनला आहे. त्यामुळे मृत्यूनंतरही परवड थांबलेली नाही. नालासोपारा पूर्व येथे रुग्णवाहिकेने भरमसाट भाड्याची मागणी केल्याने पैसे नसल्याने मृताच्या नातेवाइकांवर टॅक्सीच्या टपावर
तिरडी बांधून अंत्ययात्रा काढावी लागल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.
नालासोपाºयात राहणाºया एका इसमाचा रविवारी मृत्यू झाला. घरच्यांची रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. मात्र, अव्वाच्यासव्वा पैसे सांगण्यात आले. एकीकडे कोसळलेला दु:खाचा डोंगर आणि त्यात अंत्यसंस्कारासाठी मृतदेह नेण्यात अडचण आल्याने कुटुंबीयांनी कुटुंबीयांनी तुळींज येथील स्मशानभूमीत मृतदेह नेण्यासाठी एका टॅक्सीचा आधार घेतला. टॅक्सीच्या टपावर तिरडी बांधण्यात आली व पूर्वेकडील तुळींज, टाकीरोड मार्गावरून स्मशानभूमीत मृतदेह नेण्यात आला.