शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: मुंबई वाढवतेय वसईतील कोरोनाचा रुग्णांचा आकडा? बहुसंख्य रुग्णांचे मुंबई कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 03:00 IST

वसई-विरारमध्ये सापडलेले बहुसंख्य रुग्ण हे मुंबईमध्ये कामावर जाणारे असून त्यांच्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याने सध्या या भागातील अनेक कुटुंबे कोरोनाबाधित ठरलेली आहेत.

 - प्रतीक ठाकूर विरार : वसई-विरारचा कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा २०० हून जास्त झाला आहे. मात्र, हा आकडा मुंबईत दररोज कामावर जाणाऱ्या लोकांमुळे वाढत असल्याचे निष्पन्न झाले आहे. वसई-विरारमध्ये सापडलेले बहुसंख्य रुग्ण हे मुंबईमध्ये कामावर जाणारे असून त्यांच्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याने सध्या या भागातील अनेक कुटुंबे कोरोनाबाधित ठरलेली आहेत. त्यामुळे रोज मुंबईला कामावर जाणाºया लोकांची मुंबईतच राहण्याची सोय करण्याची मागणी होत आहे.वसई तालुक्यात लॉकडाउनचे काटेकोरपणे पालन होत आहे, पण असे असतानाही बाधित रुग्णांचा आकडा वाढत असून याचे कारण मुंबईला कामावर जाणाºया व्यक्ती अथवा त्यांच्या संपर्कात येणाºया लोकांची संख्या लक्षणीय आहे.वसई-विरारच्या शहर आणि ग्रामीण भागांतून मोठ्या प्रमाणात लोक मुंबईतील वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करीत आहेत, तर अत्यावश्यक सेवेत मोडणाºया क्षेत्रात काम करीत असल्यामुळे अनेक जणांना रोज मुंबईला कामाला कामावर जावे लागते. बँक, हॉटेल, रुग्णालय, बेस्ट, पोलीस दल आणि इतर शासकीय कर्मचारी यांचा यात समावेश असून रोज हे लोक मुंबईला ये-जा करतात.पण, सध्या मुंबई ही कोरोना महामारीचे केंद्र असल्यामुळे आणि अनेक यापैकी थेट रुग्णाच्या संपर्कात असणारी कामे करत असल्यामुळे अनेक जण बाधित होत आहेत. त्यांच्यामुळे त्यांच्या परिवारातील लोकांनाही कोरोनाची बाधा होत आहे.त्यामुळे वसई-विरारमध्ये मुंबईमुळे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे अलीकडेच महापौर प्रवीण शेट्टी यांनी प्रशासनाला पत्र लिहून ज्या कर्मचाऱ्यांना लॉकडाउन काळात मुंबईत कामासाठी जावे लागते, अशा कर्मचाºयांची सोय मुंबईतच करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून या महामारीच्या प्रसारावर नियंत्रण आणण्यात येईल.या महामारीवर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हाबंदी केली आहे, पण अशा पद्धतीने दोन जिल्ह्यांत ये-जा सुरू राहिली, तर ही महामारी पसरणारच. वसई-विरार महापालिकेनेही बाहेरून येणाºया त्यांच्या कर्मचाºयांची राहण्याची सोय वसई-विरारमध्येच केली आहे. तशी सोय मुंबई महापालिकेनेही केली पाहिजे.- रोहन राऊत, स्थानिक रहिवासीआता शासनाने याबाबत योग्य तो निर्णय घेण्याची गरज आहे. अनेक देशांनी त्यांचे जे कर्मचारी फ्रंट लाइनवर काम करत आहेत, त्यांना घरी जाण्यास मनाई केली असून त्यांची सोय कामावरच्या ठिकाणीच केली आहे. त्यामुळे त्यांचे परिवार सुरक्षित राहतील.- विनय साठे, स्थानिक रहिवासी

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसVasai Virarवसई विरारMumbaiमुंबई