शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: हृदयद्रावक! जन्मताच कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2021 11:55 IST

Coronavirus in Maharashtra: गेले सहा दिवस हे बाळ मरणाशी झुंज देत होते. मात्र त्याची ही झुंज अपयशी ठरली आहे. शनिवारी सकाळी पाचच्या सुमारास या नवजात बालकाचा मृत्यू झाला.

- हुसेन मेमन जव्हार -  लहान बालकांसाठी पालघर जिल्ह्यात आरोग्य सुविधा नसल्याने करोना लागण झालेल्या व उपचारासाठी वणवण फरफट केलेल्या पालघरमधील नवजात बाळाचा नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान करुण अंत झाला. गेले सहा दिवस हे बाळ मरणाशी झुंज देत होते. मात्र त्याची ही झुंज अपयशी ठरली आहे. शनिवारी सकाळी पाचच्या सुमारास या नवजात बालकाचा मृत्यू झाला.

प्रथम त्याला पालघरहून जव्हारच्या कुटीर रुग्णालयात  दाखल करण्यात आले होते, तेथे त्याच्यावर 24 तास उपचार सुरू होता, मात्र मुदतपूर्व प्रसूती, बाळाचे वजन कमी त्यात कोरोना पॉझिटिव्ह असल्याने दिवसेंदिवस बाळाची  प्रकृती खालावत गेली, त्यामुळे पुढील उपचारासाठी त्याला नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

 पालघर तालुक्यातील सफाळे  दारशेत येथील राहणाऱ्या अश्विनी काटेला यांनी सहा दिवसांपूर्वी पालघर शहरातील  एका खाजगी दवाखान्यात नवजात बाळाला जन्म दिला. मुदतपूर्व प्रसूती झाल्याने बाळाचे वजन कमी होते म्हणून त्याला पालघरच्या एका दुसऱ्या दवाखान्यात उपचारासाठी हलविले गेले. तेथे बाळाची अँटीजन टेस्ट केल्यानंतर बाळ पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले.

 मात्र मातेची टेस्ट निगेटिव्ह आली होती. बाळाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला पालघर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते. तेथे बालकांसाठी सुविधा नसल्याने तसेच करोना लागण झालेल्या बालकांसाठी जिल्हा प्रशासनाने कोणतीही आरोग्य सुविधा उभारली नसल्याने बाळाला उपचारासाठी फरफट करावी लागली. 

 उपचार सुरू असताना अखेर शनिवारी पहाटे 5 च्या दरम्यान बाळाने शेवटचा श्वास घेत या जगाचा निरोप घेतला. या नवजात बाळाला 6 दिवसाच्या जीवन मरणाच्या झुंजात उपचारअभावी अखेर हार पतकारावी लागली हेही तितकेच खर आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसVasai Virarवसई विरारDeathमृत्यू