शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

coronavirus: मुंबईशेजारच्या वसई-विरारमधून आली गुड न्यूज, दिवसभरात एकही कोरोनाबळी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2020 21:35 IST

CoronaVirus Positive News : दिलासादायक म्हणजे रविवारी दिवसभरात वसई-विरार महानगरपालिका हद्दीत एकही मृत्यू झालेला नाही. 

वसई - वसई -विरार शहरात रविवारी बाधित रूग्ण घटले असून 162 रूग्ण आढळून आले तर दिलासादायक म्हणजे रविवारी शहरात एकही मृत्यू झाला नाही. याउलट दिलासादायक बाब दिवसभरात सर्वाधिक अशा 190 रुग्णांना घरी सोडण्यात देखील आल्याची माहिती पालिकेने दिली. दरम्यान,  रविवारी वसई- विरार शहर महापालिका हद्दीत 162 कोरोना बाधित रूग्ण आढळून आले असल्याने आता एकूण बाधित रुग्ण संख्या ही 14 हजार 660 वर पोहचली आहे. तर दिलासादायक म्हणजे रविवारी दिवसभरात पालिका हद्दीत एकही मृत्यू झालेला नाही.  याऊलट आता पालिका हद्दीत आजवर एकूण 305 रूग्ण मयत झाले आहेत. त्यासोबत शहरात एकूण 2 हजार 509 रूग्ण विविध रुग्णालयात उपचार ही घेत आहेत. यामध्ये वसई - 59 , वसई-विरार-2 , नायगाव- 4 नालासोपारा- 37 आणि विरार- 60 तसेच यात एकूण 86 पुरुष व 76 महिला रुग्णाचा अंतर्भाव आहे.दिलासा ; आज ही सर्वाधिक 181 रूग्ण झाले मुक्त !वसई विरार शहरात पुन्हा 181 रूग्ण पालिका हद्दीतील विविध रुग्णालयातून घरी परतल्याने ही बाब दिलासादायक ठरली आहे.तर आजवर मुक्त रुग्णाची एकुण संख्या आता 11 हजार 846 वर पोहचली आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसVasai Virarवसई विरार