शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

Coronavirus : कोरोनामुळे शेती तोट्यात गेल्याने बळीराजा हवालदिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 14:41 IST

Coronavirus : कोरोनामुळे केळी शेती अडचणीत सापडली आहे त्यामुळे या शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले.

वाडा - वाडा तालुक्यातील शेतकरी भात, कडधान्य ही परंपरागत चालत आलेली पिके घेतात मात्र ती आता न परवडणारी झाली आहेत. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी बनला आहे. त्यावर उपाय म्हणून भात पिकाला पूरक व्यवसाय तालुक्यातील नाणे येथील शेतकऱ्यांनी केळी शेतीचा उपयोग केला आहे. केळी शेती बहरली देखील आहे उत्पादनही भरघोस तयार झाले आहे. मात्र कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर  लागू झालेल्या संचारबंदीमुळे ही शेती वाया गेली आहे. लागवडीचा खर्च देखील निघणार नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.

भातशेती परवडत नसल्याने येथील शेतकरी पारंपारिक शेती न करता आधुनिक शेतीकडे वळला असून फळे, फूल, भाजीपाला अशी उत्पादने घेऊन शेतात नवनवीन प्रयोग करू लागले आहेत. असाच एक प्रयोग तालुक्यातील नाणे येथील शेतकरी प्रकाश सावंत (वय-६४)  यांनी केला आहे. त्यांनी आपल्या १५ एकर जागेत ८ ते १०लाख रूपये खर्च करून केळ्याची शेती केली आहे. यापूर्वी त्यांनी आला ,चिकू, ऊस, आंब्याचे उत्पादन घेऊन ही शेती यशस्वी केली होती.

प्रकाश सावंत यांनी शेताची नांगरणी करून माती भुसभूशीत केली. त्यानंतर सऱ्या ओढून बेड तयार केले बेडवर ६×६च्या अंतरावर केळ्याच्या १० हजार रोपांची लागवड करण्यात करण्यात आली. केळीच्या जी९ जळगांव जातीच्या वाणाच्या केळ्याची लागवड केली आहे. लागवडी पासून साडे नऊ महिन्यात हे पिक तयार झाले आहे. मल्चिंग आणि ठिंबक पध्दतीने ही शेती केली असल्याचे सावंत यांनी सांगितले.

केळ्याचा एक लोंगर ३०ते ४०किलो पर्यंत जात असून एका झाडाला १०० रूपये खर्च येतो. केळ्याचे एका रोपट्याची किंमत साडेपाच रूपये आहे. १५ एकर मध्ये २०लाखांचे उत्पादन होईल अशी त्यांना आशा होती. परंतु कोरोना व्हायरस सारखी आपत्ती देशावर ओढावली असल्याने माझी आशा मावळली असल्याचे सावंत सांगतात.

केळी लागवडीचा प्रयोग स्वताच्या हिंमतीवर यशस्वी केली होता. त्यासाठी सरकारच्या कृषी विभागाकडून सहकार्य मिळाले नाही. येथील वातावरण या पिकांसाठी उत्तम आहे  शेणखताचा वापर जास्त केल्याने पिक अधिक चांगले आले आहे. लाॅकडाऊनमुळे मार्केट बंद झाल्याने वाहतूक परवाने मिळून देखील चालक येत नसल्याने माल नेणार तरी कुठे शिवाय ही केळी घरी  पिकवता येत नाहीत. त्यामुळे यावषी  ही संपूर्ण तोट्यात गेली आहे.

पालघर,बोईसर येथील दोन व्यापाऱ्यांनी ५रूपये किलो दराने केळी खरेदी करून नेली मात्र दोन महिने लोटले तरी पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे नुकसानीत अजून भर पडली आहे. कोरोनामुळे केळी शेती अडचणीत सापडली आहे त्यामुळे या शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले असून शेतीसाठी घेतलेल्या कर्जाचा डोंगर डोक्यावर बसणार असल्याने कर्जाची परतफेड करायची कशी या चक्रयूव्हात शेतकरी सापडला असून यातून सावरण्यासाठी शासनाचे सहकार्य मिळावे अन्यथा पुन्हा उभे राहणे शक्य नसल्याचे केळी उत्पादक शेतकरी प्रकाश सावंत यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

२० वर्षांपासून मी शेतीत वेगवेगळ्या प्रकारची पिके घेतो उत्पादन चांगले काढून पैसेही मिळत होते. परंतु या वषी अचानक कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अशी पहिल्यांदाच परिस्थिती ओढवली असून यातून बाहेर येण्यासाठी शासनाचे सहकार्य मिळेले हीच एक आशा आहे.

- प्रकाश सावंतकेळी उत्पादक शेतकरी-नाणे

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : पिझ्झा पडला महागात; डिलिव्हरी बॉयला कोरोनाची लागण, 72 घरं क्वारंटाईन 

Coronavirus : बापरे! बैलाच्या अंत्यसंस्कारासाठी हजारोंची गर्दी, 3000 जणांवर गुन्हा दाखल

Coronavirus : हरियाणाचा नवरदेव अन् मेक्सिकन नवरी, लॉकडाऊनमधल्या एका लग्नाची गोष्ट!

Coronavirus : केंद्र व राज्य सरकारी कार्यालये सोमवारपासून पुन्हा सुरू होणार

Coronavirus : धक्कादायक! दारू मिळाली नाही म्हणून 'मिथेनॉल' प्यायले अन्... 

Coronavirus  : 'देशातील 400 जिल्हे कोरोनामुक्त, पुढचे 2-3 आठवडे अत्यंत महत्त्वाचे'

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याVasai Virarवसई विरारFarmerशेतकरीpalgharपालघर