शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
5
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
6
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
7
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
8
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
9
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
10
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
11
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
12
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
13
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
14
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
15
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
16
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
17
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती
18
कुलदीप यादवच्या डोक्यावर 'नंबर १'चा ताज; जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना टाकले मागे!
19
पल्सर की युनिकॉर्न? 'या' २ दमदार बाईक्समध्ये कोण आहे वरचढ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स!
20
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या यशानंतर लक्ष्यला लागली मोठी लॉटरी, धर्मा प्रॉडक्शनचा चौथा सिनेमा केला साइन

Coronavirus : ‘कोरोना’ नाही डेंग्यू-मलेरियाने आजारी पडू, वसई-विरारकरांमध्ये भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 00:32 IST

सद्यस्थितीत सर्वांच्याच तोंडावर कोरोनाचे नाव असले तरी वसई-विरारमध्ये मात्र डासांचा त्रास वाढतो आहे.

विरार : वसई-विरारमध्ये एकीकडे ‘कोरोना’ विषाणूपासून बचावासाठी मास्क व सॅनिटायझर्सने हात धुवून दक्षता घेतली जात असताना दुसरीकडे मात्र डेंग्यू-मलेरिया हा आजार नाक वर काढू लागला आहे. त्यामुळे जसा देशभरात कोरोनाने मृत्यू पावलेल्यांचा आणि लागण झालेल्यांचा आकडा वाढत आहे, तसा वसईत डेंग्यू-मलेरियाचा आजार झालेल्यांचा आकडा वाढत असल्याचे चित्र आहे. यामागे शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून नियमित औषध फवारणी होत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे.सद्यस्थितीत सर्वांच्याच तोंडावर कोरोनाचे नाव असले तरी वसई-विरारमध्ये मात्र डासांचा त्रास वाढतो आहे. शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून नागरिक डेंग्यू-मलेरियासारख्या आजाराने त्रस्त होत आहेत. नागरिक या डासांमुळे हैराण झाले आहेत.मध्यंतरी डेंग्यू-मलेरियाने मृत्यू पावलेल्या व लागण झालेल्या नागरिकांचा आकडा वाढला होता. त्यानुसार महापालिकेकडून नियमित धूर फवारणी व कीटकनाशक फवारणी केली जात होती. मात्र आता नियमित औषध फवारणी होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे शहरातील गल्ली, कॉलनीत डासांचे प्रमाण अचानक वाढले असून नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे पुन्हा नागरिकांना डेंग्यू-मलेरियासदृश्य आजाराला सामोरे जावे लागते आहे. मात्र, पालिकेच्या आरोग्य विभागाकडून दर आठवड्याला प्रत्येक प्रभागात फवारणी होत असल्याचे सांगण्यात येते. प्रत्यक्षात पालिका प्रशासन कीटकनाशक फवारणीविषयी उदासीन असल्याचा नागरिकांनी आरोप आहे.पालिकेचा आरोग्य विभाग डेंग्यू-मलेरियासारखा आजार नियंत्रणात आणू शकत नाही, तर ते कोरोनासारख्या आजाराशी कसा लढा देणार, असा नागरिकांचा सवाल आहे. पालिकेने आता शौचालय, मार्केट आवारात उभ्या गाड्या, साचलेले पाणी, कचरा यावर धूर फवारणी करण्याची नागरिकांची मागणी आहे.शहरातील प्रत्येक वॉर्डमध्ये नियमित औषध फवारणी सुरू आहे. १०५ पोटिंग मशीन, १९४ स्प्रे पंप, ४०० कर्मचारी त्यावर कार्यरत असून वॉर्डप्रमाणे प्रत्येक आठ दिवसांनी फवारणी सुरू आहे. तसेच कोरोना विषाणूच्या दृष्टीने सुद्धा नायगाव, वसई, नालासोपारा व विरार या चार स्टेशन परिसरात स्प्रे मारले जात आहेत.- वसंत मुकणे, आरोग्य अधिकारी, वसई-विरार महापालिका

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोनाVasai Virarवसई विरार