शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

Coronavirus: वसई-विरार महापालिकेच्या आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश लोखंडे यांच्याकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 16:03 IST

Vasai-Virar News : आयुक्त गंगाथरन डी. कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे रजेवर गेल्याने वसई-विरार महापालिकेच्या आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश लोखंडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला असल्याची माहिती आहे.

विरार : वसई-विरार महापालिकेच्या आयुक्तपदी पुन्हा सतीश लोखंडे यांची वर्णी लागणार, या समाज माध्यमांमधील बातम्यांनी शुक्रवारी सकाळपासून वातावरण ढवळून निघाले. आयुक्त गंगाथरन डी. कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे रजेवर गेल्याने वसई-विरार महापालिकेच्या आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश लोखंडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला असल्याची माहिती आहे.

वसई-विरार महापालिकेचे विद्यमान आयुक्त गंगाथरन डी. यांची नियुक्ती २५ मार्च २०२० रोजी झाली होती. तेव्हापासून आजपर्यंत त्यांचा कार्यकाल वादग्रस्त राहिला आहे. नागरिक, लोकप्रतिनिधी, पत्रकार यांच्यासोबत नसलेला समन्वय व नियुक्ती काळात घेतलेले वादग्रस्त निर्णय, शिवसेना नेत्यांना आयुक्त देत असलेले झुकते माप यामुळे आयुक्त गंगाथरन डी. यांच्याविरोधात सुरुवातीपासूनच वातावरण होते. दरम्यान; कोविड-१९ काळात महापालिकेच्या नियोजनाचे परिणाम म्हणून वसई-विरार महापालिका क्षेत्रात कोविड-१९चे संक्रमण वाढल्याचे आरोपही आयुक्त गंगाथरन डी. यांच्यावर विरोधी पक्षाकडून करण्यात आले आहेत. अशा स्थितीत वसई-विरार महापालिका आयुक्तपदी सतीश लोखंडे यांची पुन्हा नियुक्ती होणार, या बातमीला महत्त्व असल्याने शुक्रवारी सकाळपासूनच समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात चर्चेला उधाण आले होते.सतीश लोखंडे यांनी २०१६ पासून वसई-विरार महापालिकेचा कार्यभार सांभाळलेला आहे. साडेतीन वर्षाचा कार्यकाल पूर्ण केल्यानंतर सतीश लोखंडे यांची नियुक्ती राज्याच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या सीईओपदी झाली होती. तर त्यांच्या जागी वसई-विरार महापालिकेचे आयुक्त म्हणून बी.जी. पवार आले होते. वसई-विरार महापालिका आयुक्तपदी असताना सतीश लोखंडे यांनी अनेक विकासकामांना मूर्त रूप दिले होते. विशेष म्हणजे नागरिकांसोबत संवाद साधता यावा, याकरता बुधवार-गुरुवार हे दोन वार जनतेकरता राखून ठेवले होते. सतीश लोखंडे यांचा पूर्वानुभव आणि जनता व लोकप्रतिनिधी यांच्यासोबत असलेला समन्वय व संवाद लक्षात घेता ते या संकटकाळी न्याय देऊ शकतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसVasai Virarवसई विरार