Coronavirus: पालघरमध्ये ४५ वर्षीय इसमाचा मृत्यू, कोरोनाचा अहवाल येण्याची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 15:13 IST2020-04-26T15:11:33+5:302020-04-26T15:13:18+5:30
पालघरमध्ये 11 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत 1 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Coronavirus: पालघरमध्ये ४५ वर्षीय इसमाचा मृत्यू, कोरोनाचा अहवाल येण्याची प्रतीक्षा
पालघर - जिल्ह्यातील सातपाटी येथील एका 45 वर्षीय इसमाचा मृत्यू शनिवारी रात्री 12 च्या दरम्यान पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात झाला. त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचा संशय डॉक्टरांकडून व्यक्त केलं जात आहे. त्याच्या घशातील स्रावांचे नमुने घेण्यात आले असून ते तपासणीसाठी मुंबईत पाठविण्यात आले आहेत. त्याच्या मृत्यूनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात न देता पालघर नगरपालिकेच्या स्मशानभूमीत पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पालघरमध्ये 11 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत 1 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. डहाणू तालुक्यात 8 बाधित असून वसई ग्रामीण 1 तर 1 मृत्यू आणि वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात 111 बधितांवर उपचार सुरू असून 8 बाधितांचा मृत्यू झाला आहे. एकूण जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 130 झाली असून एकूण 574 रुग्णांचा अहवाल येणे अद्याप बाकी आहेत.