CoronaVirus News: वसई-विरारमध्ये १८ ठिकाणी १४ दिवस कडक बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 23:39 IST2020-06-19T23:39:40+5:302020-06-19T23:39:48+5:30
रुग्ण वाढू लागल्यामुळे वसई-विरार महापालिका प्रशासनाची चिंता वाढली

CoronaVirus News: वसई-विरारमध्ये १८ ठिकाणी १४ दिवस कडक बंद
विरार : राज्य शासनाने लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर पावसाळ्याच्या तोंडावर रुग्ण वाढू लागल्यामुळे वसई-विरार महापालिका प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी नव्याने फतवा काढून रुग्ण आढळलेल्या पाच प्रभागांतील १८ ठिकाणे प्रतिबंधित घोषित केली आहेत. तेथे १४ दिवस कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे.
प्रभाग समिती ‘ब’मध्ये विरार, प्रभाग समिती ‘सी’मधील चंदनसार विभाग, प्रभाग समिती ‘ड’ आचोळे विभाग, प्रभाग समिती ‘एफ’मध्ये पेल्हार विभाग, प्रभाग समिती जीमध्ये वालीव क्षेत्रातील १८ ठिकाणी १४ दिवसांसाठी कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. या क्षेत्रात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यवसाय व नागरिकांना ये-जा करण्यास आयुक्तांच्या आदेशानुसार मनाई केली आहे. कोरोनाचा धोका वाढल्यामुळे पालिका प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे.