शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

Corona Vaccination : पालघर जिल्ह्यात फक्त 3,59,966 लसीकरण; सर्वाधिक वसई-विरारमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 09:30 IST

Corona Vaccination : वसई-विरारसह पालघर जिल्ह्याची एकूण लोकसंख्या सुमारे तीस लाखांपेक्षा जास्त असून आजवर झालेले हे लसीकरण खूपच कमी आहे.

पालघर : पालघर जिल्ह्यात आजवर ३ लाख ५९ हजार ९६६ जणांचे लसीकरण करण्यात आले असून लसीकरणाचा वेग वाढवण्याचा मागणी होत आहे. जिल्ह्यातील डहाणू तालुक्यामध्ये २८ हजार ०३५, जव्हार ९ हजार ८१९, मोखाडा ३ हजार ४२९, पालघर ९० हजार ५५६, तलासरी ४ हजार ६०९, वसई ग्रामीण २३ हजार ९७९, विक्रमगड ७ हजार ४०, वाडा २१ हजार ८८०, तर वसई-विरार १ लाख ७० हजार ६१९ जणांचे लसीकरण झालेले आहे.वसई-विरारसह पालघर जिल्ह्याची एकूण लोकसंख्या सुमारे तीस लाखांपेक्षा जास्त असून आजवर झालेले हे लसीकरण खूपच कमी आहे. जिल्ह्यात आजवर सर्वाधिक लसीकरण वसई-विरारमध्ये झालेले आहे, परंतु महापालिका क्षेत्रातील लोकसंख्याही मोठी असल्याने लसीकरणाची टक्केवारी खूपच कमी असल्याचे बोलले जात आहे.जिल्ह्यात वसई-विरारनंतर पालघर तालुक्यात रुग्णसंख्या जास्त आढळलेली आहे. आता कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यात आरोग्य यंत्रणा कमालीची यशस्वी ठरत असताना त्याच वेळी होत असलेल्या लसीकरणाचा वेग वाढवणे गरजेचे असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत. जिल्ह्यात सर्वात कमी लसीकरण झालेले चार तालुके असून जव्हार, मोखाडा, तलासरी आणि विक्रमगड या चार तालुक्यांनी १० हजारचाही टप्पा ओलांडलेला नाही. मध्यंतरी ग्रामीण भागात लसीकरणाबाबत अफवा पसरल्याचेही बोलले जात होते. त्यामुळेही जव्हार, मोखाडा, तलासरी आणि विक्रमगड या तालुक्यांतील ग्रामीण भागात लसीकरण कमी झाले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.पालघर जिल्ह्यामध्ये आजवर आरोग्य विभागातील २६ हजार ३९४ कर्मचाऱ्यांनी पहिला डोस, तर १७ हजार ३१६ जणांनी दुसरा डोस घेतला आहे.फ्रंटलाईन वर्करपैकी २८ हजार ४८५ जणांनी पहिला डोस, तर ११ हजार ५९७ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. १८ ते ४५ वयोगटातील १८ हजार २१७ जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर ४५ ते ६० वयोगटातील १ लाख २७ हजार ५९१ जणांनी पहिला डोस आणि ९ हजार १२ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. ६० वर्षांवरील ९४ हजार ६७० जणांनी पहिला डास तर २६ हजार ६८४ जणांनी दुसरा डोस घेतला आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसpalgharपालघरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस