शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
4
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
5
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
6
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
7
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
8
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
9
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
10
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
12
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
13
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
14
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
15
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
16
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
17
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
18
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?

वसई-विरारमध्ये कोरोनाने 10 दिवसांत 50 मृत्युमुखी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 23:51 IST

चिंता वाढली : बाधितांसह मरण पावणाऱ्यांचा वाढतोय ग्राफ 

लोकमत न्यूज नेटवर्क पालघर/वसई : जिल्ह्यातील एकमेव महानगरपालिका असलेल्या वसई-विरारमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात  वाढत आहेत. कोरोनाची ही दुसरी लाट महापालिका हद्दीमध्ये कहर माजवत असून गेल्या १० दिवसांत तब्बल ७ हजार २७८ नवीन रुग्ण आढळले आहेत, तर ५० जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णवाढीसह कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांचा वाढता ग्राफ आरोग्य यंत्रणेची झोप उडवणारा ठरला आहे.वसई-विरार महापालिका हद्दीत मंगळवारी ८७९ नवीन रुग्ण आढळले असून पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ४३२ रुग्ण बरे झाले आहेत. त्याआधी ११ एप्रिल रोजी ७५४ नवीन रुग्ण आढळले होते, तर २४१ जण बरे होऊन घरी परतले होते. १२ एप्रिल रोजी ४९२ नवीन रुग्ण आढळले, तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला होता. ३१४ जणांनी कोरोनावर मात केली होती. १३ एप्रिल रोजी ७०६ नवीन रुग्ण, तर तीन जणांचा मृत्यू झाला होता. २६६ जण बरे झाले होते. १४ एप्रिल रोजी ६४१ जण बाधित झाले होते, तर ८ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. १५ एप्रिल रोजी ५९८ नवीन रुग्ण आढळले होते. या दिवशी एकही रुग्ण दगावला नव्हता. ३४८ जणांनी कोरोनावर मात केली होती. १६ एप्रिल रोजी ७८४ नवीन रुग्ण आढळले होते, तर ७ जणांचा मृत्यू झाला होता. ३६७ जण बरे झाले होते. १७ एप्रिल रोजी ८१४ जण बाधित ठरले होते, तर ८ जणांनी आपले प्राण गमावले होते. १८ एप्रिल रोजी दुसऱ्या लाटेतील सर्वाधिक ९०८ रुग्ण नवीन आढळले होते, तर ९ जणांचा मृत्यू झाला होता. ३५२ जणांनी कोरोनावर मात केली होती. १९ एप्रिल रोजी ७०८ नवीन रुग्ण आढळले होते, तर ८ जणांना आपले जीव गमवावे लागले होते आणि ४४२ जण बरे होऊन घरी परतले होते. दुसऱ्या लाटेनंतर गेल्या दहा दिवसांतील ही वाढती आकडेवारी आरोग्य यंत्रणेची चिंता वाढवणारी ठरली आहे.

११ एप्रिलपासून ३,०१४ जणांची कोरोनावर मात गेल्या दहा दिवसांत एकीकडे ६ हजार ३९९ रुग्ण आढळलेले असताना दुसरीकडे मात्र ३ हजार १४ जणांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. दरम्यान, वसई-विरार परिसरात वाढत असलेले नवीन रुग्ण आणि मृत्यूचा ग्राफ पाहता नियम पाळणाऱ्या नागरिकांची मात्र चिंता वाढली आहे.

आकडेवारी चिंताजनक महापालिकेने अधिकृतपणे प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतील हे आकडे आहेत. मृतांच्या आकडेवारीत लवपाछपवी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेले हे आकडे चिंताजनक आहेत.

यंत्रणेवर वाढला ताणगेल्या १० दिवसांत महानगरपालिका हद्दीत वाढत असलेल्या रुग्णसंख्येने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. अनेक रुग्णांना रुग्णालयांमध्ये खाटा सुद्धा उपलब्ध होत नसल्याने नातेवाइकांची चिंता वाढली आहे.