प्राचार्यांना ठार करण्याची कॉपी बहाद्दराची धमकी
By Admin | Updated: April 10, 2016 00:53 IST2016-04-10T00:53:03+5:302016-04-10T00:53:03+5:30
तलासरी येथील कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर महाविद्यालयातील एफ.वाय.बी.ए चा विद्यार्थी तबरेज कुरेशी याला कॉपी करताना प्राचार्य शिखरे यांनी पकडले असता त्याने त्यांना ठार मारण्याची

प्राचार्यांना ठार करण्याची कॉपी बहाद्दराची धमकी
तलासरी : तलासरी येथील कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर महाविद्यालयातील एफ.वाय.बी.ए चा विद्यार्थी तबरेज कुरेशी याला कॉपी करताना प्राचार्य शिखरे यांनी पकडले असता त्याने त्यांना ठार मारण्याची धमकी दिल्याने त्यास महाविद्यालयातून रस्टीकेट केले आहे.
यावेळी त्यास कॉलेजच्या आवाराबाहेर काढल्यानंतर आपले गुंडप्रवृत्तीचे मित्र जमा करून प्राचार्य कॉलेजबाहेर आल्यास ठार मारीन अशी धमकी देऊ लागल्याने प्राचार्यानी त्या विद्यार्थ्यांच्या पालकास बोलावून घटनेची माहिती दिली.
प्रसंगावधान रोखून पालकांनी त्यास घरी नेले. मात्र, या घटनेमुळे महाविद्यालायाची प्रतिष्ठा पणाला लागली. तसेच त्या विद्यार्थ्यांनी प्राचार्यांना अपशब्द वापरल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे हा विद्यार्थी भाजपाच्या अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष शकिल कुरेशी यांचा मुलगा असल्याने तलासरीमध्ये हा विषय चर्चेचा बनला आहे.