वाड्यात ठेकेदाराला ठेकेदाराची मारहाण

By Admin | Updated: September 2, 2016 03:34 IST2016-09-02T03:34:03+5:302016-09-02T03:34:03+5:30

कळंभोळी येथील ठेकेदार किशोर वेखंडे यांन बांधकाम ठेक्याच्या वादावरून मंगळवारी (दि.३०) दुपारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर विक्रमगड येथील ठेकेदाराने बेदम

Contractor strikes the contractor in the castle | वाड्यात ठेकेदाराला ठेकेदाराची मारहाण

वाड्यात ठेकेदाराला ठेकेदाराची मारहाण

वाडा : कळंभोळी येथील ठेकेदार किशोर वेखंडे यांन बांधकाम ठेक्याच्या वादावरून मंगळवारी (दि.३०) दुपारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर विक्रमगड येथील ठेकेदाराने बेदम मारहाण केल्याची घटना घडली.
वेखंडे हे मंगळवारी दुपारच्या सुमारास साबाच्या कार्यालयात निविदांचे आदेश घेण्याकरिता गेले होते. काम आटोपून ते त्यांच्या स्कॉर्पीओ या गाडीतून जात असताना कशिवली (विक्र मगड) येथील ठेकेदार सचिन दुपारे यांनी इनोव्हा आडवी घातली. ती बाजूला घेण्यासाठी हॉर्न देऊन साईड मागत असताना सचिन याने ‘तू कशी कामे घेतो ते मी बघतोच, तुला सांगितलेले समजत नाही का? जर ऐकलेस नाही तर तुला बघून घेतो’ असे सांगून शिवीगाळ करू लागला. त्यानंतर तू नियमाप्रमाणे निविदा टाकून काम मिळव असे किशोर यांनी सांगताच त्याने किशोर यांना गाडीतून बाहेर खेचले. त्याने व त्याच्या साथीदारांनी किशोरला बेदम मारहाण केली. या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. (वार्ताहर)

Web Title: Contractor strikes the contractor in the castle