एकात्मिक पाणलोट विभागातील कंत्राटी कामगार पगाराविना
By Admin | Updated: September 11, 2015 23:14 IST2015-09-11T23:14:15+5:302015-09-11T23:14:15+5:30
केंद्रसरकार पुरस्कृत महाराष्ट्र राज्य कृषी विभाग अंतर्गत पालघर जिल्ह्यात जव्हार, मोखाडा, वाडा तसेच पालघर या तालुक्यांमध्ये एकात्मिक पाणलोट विभागातील उपजीवीका तज्ञ

एकात्मिक पाणलोट विभागातील कंत्राटी कामगार पगाराविना
मोखाडा : केंद्रसरकार पुरस्कृत महाराष्ट्र राज्य कृषी विभाग अंतर्गत पालघर जिल्ह्यात जव्हार, मोखाडा, वाडा तसेच पालघर या तालुक्यांमध्ये एकात्मिक पाणलोट विभागातील उपजीवीका तज्ञ, कृषी तज्ञ व समुदाय संघटक या कंत्राटी कामगारांना चार महिन्यापासून पगारच मिळाला नसल्याने सुमारे ४० ते ५० कुटूंबावर ऐन गणपतीत उपासमारीची वेळ आली आहे.
जव्हार, मोखाडा, वाडा व पालघर या तालुक्यांत एकात्मिक पाणलोट अंतर्गत महिला बचत गटांना निधी वाटप करणे, बेरोजगार युवकांना प्रशिक्षण व निधी वाटप करणे, शेती विषयक माहिती शेतकऱ्यांना देणे ही कामे या कंत्राटी कामगारांकडून केली जातात. यासंदर्भात पालघर जिल्हा कृषी अधिकारी डॉ. प्रकाश पवार यांच्याशी संपर्क केला असता त्यांचे चार महिने पगार न होणे शक्य नाही असे सांगितले. (वार्ताहर)