शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: परवानगीशिवाय मुख्यालयाचे बांधकाम, सुपरवायझरचा बळी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 01:39 IST

मुख्य ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याऐवजी पालघर पोलिसांनी एका सुपरवायझरवर गुन्हा दाखल करुन बड्या ठेकेदाराला वाचविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे.

हितेन नाईक पालघर : पालघर मुख्यालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी परवानगी न घेता नवी मुंबईतून कामगारांना आणून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी मुख्य ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याऐवजी पालघर पोलिसांनी एका सुपरवायझरवर गुन्हा दाखल करुन बड्या ठेकेदाराला वाचविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे.पालघर मुख्यालयाच्या इमारतीचे काम सहा वर्षांपासून अपूर्णावस्थेत आहे. लॉकडाऊनमुळे एक महिन्यापासून हे काम बंदच होते. पावसाळ्याच्या आत हे काम पूर्ण करणे महत्त्वाचे असल्याने पालघर सिडको कार्यालयातील कार्यकारी अभियंत्यांनी कामाची परवानगी जिल्हाधिकारी कार्यालयास ईमेलद्वारे परवानगी पाठवली होती. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीच्या बांधकामाची परवानगी ठेकेदार प्रकाश कॉन्स्ट्रोवेल लि. यांना तर इंटेरिअर डेकोरेटरचे काम डेकोर होम इंडिया प्रा.लि. यांना दिली होती. जिल्हा परिषद इमारतीचे काम स्प्रेक्ट्रम इन्फ्रास्ट्रक्चर यांना तर इंटेरिअर डेकोरेटरचे काम लीना पॉवरटेक इंजिनीअर्स लि. यांना, अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंगचे काम हर्ष कन्स्ट्रक्शन प्रा.लि. यांना तर इंटेरिअरचे काम लीना पॉवरटेक इंजिनीअर्स लि. यांना, तसेच शासकीय कर्मचाऱ्यांच्या इमारतीचे व व्हीआयपी बंगल्याचे काम वसंत कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड, इंडिया यांना देण्यात आले होते. अन्य कामे मे. व्ही.बी. भोईर यांना दिल्याने त्यांनी कामाची परवानगी १७ एप्रिल रोजी दिली होती. कामावरील कर्मचाºयांची दिवसातून दोन वेळा तपासणी करावी; कामगार, वाहनांची नोंद पोलीस ठाण्यात करावी, अल्प मनुष्यबळाचा वापर करावा, या जिल्हाधिकाºयांच्या आदेशाचा अवमान होत असल्याचे तहसीलदार सुनील शिंदे यांच्या निदर्शनास आले. मुंबईमध्ये रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत असताना ठेकेदाराने परवानगीशिवाय दोनवेळा नवी मुंबईहून कामगारांची वाहतूक केल्याचे तहसीलदारांना कळले. त्यांनी कारवाईचे आदेश पालघर पोलिसांना दिल्यानंतर ठेकेदाराऐवजी धर्मेश पटेल नामक सुपरवायझरवर गुन्हा दाखल करून बड्या ठेकेदाराला वाचविण्याचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त होत आहे. तपासात ठेकेदाराचा सहभाग दिसल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करु, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस