वसईकरांच्या किनारा स्वच्छता मोहीमेत चार टन कचरा संकलित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 05:26 IST2018-10-03T05:26:08+5:302018-10-03T05:26:31+5:30
वसईतील युवकांनी भुईगांव किनारा स्वच्छता मोहीम हाती घेऊन व हजारो टन कचरा गोळा केला. या तरूणांनी पुढाकार घऊन भुईगांव समुद्र किनारा स्वच्छ करण्याचे ठरविले.

वसईकरांच्या किनारा स्वच्छता मोहीमेत चार टन कचरा संकलित
नालासोपारा : वसईतील युवकांनी भुईगांव किनारा स्वच्छता मोहीम हाती घेऊन व हजारो टन कचरा गोळा केला. या तरूणांनी पुढाकार घऊन भुईगांव समुद्र किनारा स्वच्छ करण्याचे ठरविले. यासाठी सोशल मिडीयाचा वापर केला गेला. वेगवेगळ्या संस्था व कॉलेजच्या विद्यार्थी -विद्यार्थीनींचा ,ग्रुप एकत्र आले होते. त्यात ३५० पेक्षा अधिक तरूणांनी सहभाग घेतला होता.त्यात ७५ टक्के तरुणी होत्या. पुष्पांजली कॉलेज, पेडल पॉवर, टाईम टू डान्स अकॅडमी, मॉ एनजीओ, सांडोर युथ ग्रुप,कशक ग्रुप हे सहभागी होते.
विदेशी सून सुझनानं यांची होती प्रेरणा
सुझनानं लिस्बन फेराओ हि हंगेरीतील महिला मात्र वसईतील लिस्बन फेराओ सोबत प्रेमविवाह करून सासरी आली.आपल्या चिमुरडीसोबत ती रानगांव समुद्रकिनारी गेल्यावर तेथील प्लास्टीक कचरा पाहून तीने तो स्वच्छ करण्याचा चंग बांधला. आपल्या पती व मुलीसोबत तीने हा संपूर्ण समुद्रकिनारा स्वच्छ करून पर्यटनाच्या नावाखाली समुद्रकिनारा अस्वच्छ करणा-या पर्यटकांच्या व स्थानिक नागरिकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे.मात्र या तरूणांचे प्रेरणास्थान सुझनानं लिस्बन फेराओ या हंगेरी येथे असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.