स्मशानभूमी आहे तरी नदीपात्रात दहन
By Admin | Updated: February 22, 2016 00:19 IST2016-02-22T00:19:37+5:302016-02-22T00:19:37+5:30
कंचाड-कुर्झे रस्त्यालगतच्या ब्राह्मणगावातील मृतदेहाचे दहन स्मशानभूमीच्या ऐवजी कुर्झे देहर्जा नदीच्या पात्रात केले जात असल्यामुळे काठावर राहणारे ग्रामस्थ व मुलांमध्ये भीतीचे

स्मशानभूमी आहे तरी नदीपात्रात दहन
मनोर : कंचाड-कुर्झे रस्त्यालगतच्या ब्राह्मणगावातील मृतदेहाचे दहन स्मशानभूमीच्या ऐवजी कुर्झे देहर्जा नदीच्या पात्रात केले जात असल्यामुळे काठावर राहणारे ग्रामस्थ व मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे तरी देखील ग्रामपंचायत व महसूलखाते कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही.
ब्राह्मणगावासाठी सर्व्हे नं २४ मध्ये स्वतंत्र सातबाऱ्यावर हिंदू स्मशानभूमीसाठी तीन गुंठे जमीन आहे तरी देखील ग्रामस्थ त्याचा वापर न करता जाणूनबुजून नदीकाठच्या रहिवाशांच्या घरासमोर प्रेताचे दहन करतात. त्यामुळे त्या घरामध्ये धूर जातो, रोगराई होते तसेच लहानमुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरते. कंचाड कुर्झे नदीवरील असलेल्या पुलावरून शेकडो विद्यार्थी शाळेत ये-जा करतात. दहन होत असलेल्या प्रेताला ते घाबरतात असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. त्या अनुषंगाने २८/२/२०१२ रोजी किशोर दत्तात्रय शेलार, मंजिरी किशोर शेलार, कृष्णा सुतार व इतरांनी तहसीलदार वाडा यांच्याकडे याबाबत तक्रार केली परंतु त्याची कोणतीही दखल घेतली गेलेली नाही. गेल्या २५ वर्षांपासून नदीकाठी आमचे घर आहे. त्यामध्ये मुलाबाळा सहीत राहतो. नदीच्या पलिकडील तीरावर ब्राह्मणगाव आहे. तेथील दिलीप मुकुंद पाटील, नागेश पाटील, कल्पेश पाटील, सदानंद पाटील हर्षद एस पाटील व इतरांनी जाणूनबुजून त्रास देण्यासाठी कै. काळु भगत यांच्या पार्थिवाचे दहन घरासमोर जाळले याची माहिती दिली होती. तिचीही कोणतीही दखल घेतली गेलेली नाही.
त्यापूर्वी १९/११/२०११ रोजी प्रदीप माने यांनी केलेल्या तक्रारीची त्यावेळेच्या वाड्याच्या तहसीलदारांनी दखल घेऊन सर्व्हे नं २४ मध्ये स्मशानभूमी बांधून त्या ठिकाणीच प्रेतांचे दहन करा, नदीच्या पात्रात करू नका असे आदेश ग्रुपग्रामपंचायत आंबिवली ब्राह्मणगाव यांना दिले होते तरी सुद्धा जैसे थे परिस्थिती आहे, न्याय मिळत नाही म्हणून शेलार कुटुंबिय व काही रहिवाशांनी प्रथम हायकोर्टात व नंतर सिव्हील कोर्ट भिवंडी येथे एस.सी.न. ५५६/२०१३ मध्ये शासन व काही समाजकंटकाविरुद्ध दावा दाखल केला असून तो न्यायप्रविष्ट आहे, तरीही त्याला न जुमानता प्रेताचे दहन केले जाते आहे.