गावठी कोलम तांदूळ नामशेष होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 12:08 AM2019-10-13T00:08:19+5:302019-10-13T00:08:41+5:30

संडे अँकर । निसर्गाचा लहरीपणा : महागाई, कमी बाजार भावामुळे दुर्लक्ष

Colum Rice will not in future? | गावठी कोलम तांदूळ नामशेष होणार?

गावठी कोलम तांदूळ नामशेष होणार?

googlenewsNext

विक्रमगड : कमी कालावधीत आणि खाण्यास, गोडीस रुचकर असलेला गावठी कोलम झिनी तांदळाच्या उत्पादनात दिवसेंदिवस घटत चालले आहे. पूर्वीप्रमाणे त्याची लागवड होत नसल्याने हा तांदूळ सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. कमी बाजार भाव, मजुरीचे वाढते दर, शेती साहित्याच्या वाढलेल्या किंमती, महागाई आणि निसर्गाच्या लहरीमुळे विक्रमगड तालुक्यातून घेतल्या जाणाऱ्या या रुचकर गावठी लहान दाण्यांच्या भात पिकाचे उत्पादन दिवसेंदिवस कमी होत आहे. यामुळे एक चांगल्या भात पिकाची जात धोक्यात आली आहे. सध्या हा तांदूळ बाजारात दुकानावर ५० ते ७० रु पये किलो दराने विकला जात आहे.


तरूणाई शेती उत्पादनाबाबत उदासीन आहे. काही ठिकाणी नवनवीन सुधारित जातीच्या वाणाची लागवड केली जात असल्याने या कोलम तांदळाचे उत्पादन घटले आहे. या तांदळाच्या उत्पादनासाठी मेहनत घ्यावी लागते आणि खर्चही बराच आहे. या तांदळाचा दाणा लहान व गोडीस असल्याने निसर्गाने साथ दिली तर ठीक नाहीतर नुकसान सहन करावे लागते. परंतु या भात पिकाला पूर्वीचे गत वैभव प्राप्त होण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे विक्रमगड येथील शेतकरी रणधीर पाटील यांनी सांगितले.
विक्रमगड तालुक्यातील मृदा पावसाचे प्रमाण व अनुकूल हवामान पाहता साधारण अडीच दशकांपूर्वी कोलम या भात पिकाचे उत्पादन सर्व शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात घेतले जात होते. एक सेंटीमीटर लांबीचा असणारा शुभ्र व आकर्षक दिसणारा तांदूळ आणि त्याला येणारा गोड सुगंध यामुळे हा कोलम तांदूळ खाण्यासाठी अतिशय रु चकर म्हणून प्रसिद्ध आहे.


या तांदळाची सर्वत्र मोठी मागणी होती. परंतु कालांतराने शेतकरी आधुनिक युगातील नवीन व जादा उत्पादन देणाºया भात पिकाकडे वळल्याने जास्त मेहनत व खर्चिक असलेला कोलम तांदुळाचे उत्पादन घेण्याबाबत तो उदासीन झाला आहे.


पीक घेण्यास विलंब झाल्यास होते नुकसान
कोलम जातीच्या भात लागवडीचा काळ मर्यादित आहे. त्याची लागवड तसेच लावणीही वेळेत होणे गरजेचे आहे. तर कधी नाही त्यामुळे हे पीक घेण्यास विलंब झाल्यास नुकसान सहन करावे लागते. आता निसर्गाचे काही खरे दिसत नसल्याने गेल्या चार पाच वर्षापासून गावठी कोलम तांदळाचे उत्पादन घट होताना दिसत आहे. तर काही शेतकरी महागाई व खर्चाचे प्रमाण पाहून आपली जमीन लागवड न करता लागवडीस दिल्या आहेत.


निसर्गाच्या लहरीपणाचा फटका
कोलम भाताचे वाण उत्पादन घेण्यासाठी खर्चही तेवढाच करावा लागतो. निसर्गाच्या लहरीपणाचाही फटका बसतो. कारण गेल्या दोन चार वर्षात पाऊस वेळेत होत नाही व पाऊस वेळेत झाला तर तो उघडीप देण्याचे नाव घेत नाही. या सर्व गोष्टीमुळे हे चांगले पीक घेण्यासाठी केलेला खर्च वजा जाता उत्पन्न हाती लागत नसल्याने कोलम वाणाचे उत्पादन घेण्यासाठी शेतकरी तितकेसे तयार नसतात.
- बबन साबरे, ओंदे, शेतकरी

Web Title: Colum Rice will not in future?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.