शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
2
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
3
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
4
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
5
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
6
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
7
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
8
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
10
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
11
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
12
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
13
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
14
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
15
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
17
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
18
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
19
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
20
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव

नारळाचे उत्पादन निम्म्याने घटणार; बागायतदारांना आर्थिक झळ, नारळ महागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 22:57 IST

कीडरोग आणि अति पावसाचा फटका

अनिरुद्ध पाटीलबोर्डी : यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने भात, चिकू आणि नारळ इ. उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. दरम्यान, नारळ उत्पादनात निम्म्याने घट होऊन आगामी काळात या फळांच्या किमती दुपटीने वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे धार्मिक सण - उत्सव आणि लग्नसराई काळात किमती वाढून ग्राहकांच्या खिशाला आर्थिक झळ बसणार आहे.

पालघर जिल्ह्यात सुमारे साडेपाच हेक्टर क्षेत्र नारळ लागवडीचे असून सागरी भागात मोठ्या प्रमाणात बागायती आहेत. रेताड जमीन, उष्ण तसेच दमट वातावरणात वेस्ट कोस्टल टॉल या जातीचे उत्पादन घेतले जाते. या फळांचा मोठा आकार, पाण्याची चव आणि आतील मलाई यासाठी दक्षिणेकडील नारळापेक्षा त्याला वाढती मागणी आहे. मात्र यंदा पावसाचे प्रमाण आणि तीव्रता अधिक असल्याने फुल आणि फळगळतीचे संकट ओढावले आहे. त्यामुळे पक्व नारळ मिळेपर्यंत निम्मेच उत्पादन हाती येईल अशी शक्यता बागायतदारांनी वर्तवली आहे.

सध्या या झाडांवर स्पायरेलिंग व्हाईटफ्लाय या किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. डहाणू आणि बोर्डी परिसरात नारळ बागांमधील अनेक झाडांवर स्पायरेलिंग व्हाईट फ्लाय नावाची ही कीड आढळली आहे. ती झावळीच्या खालच्या बाजूला राहून अंडी घालते. त्याचा आकार हा गोल रिंगणासारखा असतो. हे कीटक शरीरातून चीकट द्रव सोडत असून त्यावर sooty mold नावाची काळी बुरशी वाढल्याने प्रकाश संश्लेषण क्रि या मंदावली जाऊन अन्न निर्मितीस अडथळा येतो. दरम्यान, पोषणाच्या कमतरतेमुळे फुलाफळांचे प्रमाण कमी होऊन उत्पादन घटणार आहे. शिवाय नारळा व्यतिरिक्त पेरू, सफेद जांबु, फुलझाडे आणि शोभेची झाडे क्रोटन आदीवर ती मोठ्या प्रमाणात आढळत असल्याने बागायतदारांचे आर्थिक नुकसान होणार आहे.

दरम्यान, नारळाचे प्रमाण कमी होऊन किंमतीत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता, आगामी सण - उत्सव आणि लग्नसराईत नागरिकांच्या खिशाला आर्थिक झळ बसणार आहे. त्याचा आर्थिक फायदा घाऊक आणि किरकोळ व्यापारी घेतील. नेहमीप्रमाणे उत्पादक वंचित राहणार असल्याने शासकीय मदत मिळणार का? याकडे त्यांचे लक्ष लागले आहे.या किडीची ओळख, व्यवस्थापन व नियंत्रण या विषयी माहिती तसेच शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी जिल्हा कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड येथे नजीकच्या काळात दोन प्रशिक्षणे घेण्यात आली. त्यानंतर शेतकऱ्यांनी किटकनाशकाची फवारणी करण्याचा अवलंब केला आहे. - प्रा. उत्तम सहाणे, कृषी विज्ञान केंद्र, कोसबाडपालघर जिल्ह्यात नारळ क्षेत्र साडेपाच हेक्टर आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण अधिक असल्याने फुलगळती झाल्याने उत्पादनात निम्म्याने घटणार आहे. त्याचा आर्थिक फटका नारळ बागायतदारांना बसेल. - यज्ञेश सावे, अध्यक्ष, ठाणे जिल्हा नारळ उत्पादक हितवर्धक संस्था

टॅग्स :Rainपाऊस