शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांची भेट घेतली; 'तुतारी' सोडून भाजपला पाठिंबा देताच अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
3
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
4
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
5
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
6
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
9
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
10
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
11
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
12
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
13
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
14
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
15
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
16
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
17
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
18
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
19
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
20
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप

पांढरी माशीच्या विळख्यात नारळबागा; सुपारी, केळी, पपईच्या झाडांवरही प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2020 12:54 AM

जिल्हास्तरीय प्रशिक्षणात तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

डहाणू/बोर्डी : पालघर जिल्ह्याला वसई ते झाई हा सव्वाशे कि.मी.चा समुद्रकिनारा लाभला असून येथील वाळूमिश्रित जमीन, क्षारयुक्त पाणी आणि उष्ण-दमट हवामानामुळे नारळाची झाडे जोमाने वाढतात, मात्र अलीकडच्या काळात या परिसरातील नारळबागा स्पायरेलिंग पांढरी माशीच्या विळख्यात सापडल्या आहेत. ही कीड नारळाप्रमाणेच सुपारी, केळी, पपई व शोभेची झाडे आणि आता चिकूवरही वाढत असल्याने परिसरातील बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

पालघर जिल्ह्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात नारळाच्या झाडांची लागवड झालेली आहे. दहा वर्षांपूर्वी प्रती माड सरासरी २०० फळे प्रतिवर्षी मिळायची, मात्र रोगाच्या प्रादुर्भावाने हे उत्पादन निम्म्यावर आले आहे. परिणामत: झाडांची तोड करून नवीन लागवडीकडे बागायतदार पाठ फिरवताना दिसत आहेत. स्पायरेलिंग पांढरी माशी ही नारळ झाडाच्या पानांतून रस शोषून घेते. त्याच वेळी तिच्या शरिरातून चिकट, गोड पदार्थ बाहेर सोडते. त्यावर काळ्या रंगाची शुटी मोल्ड ही बुरशी पानावर वाढते.

या काळ्या बुरशीच्या वाढीमुळे पानांची प्रकाश संश्लेषण क्रिया थांबून अन्ननिर्मिती प्रक्रियेत अडथळा येऊन नवीन फुलाफळांचे प्रमाण कमी होते. ही कीड नारळाप्रमाणेच सुपारी, केळी, पपई व शोभेची झाडे आणि आता चिकूवर सुद्धा वाढत आहे. हा प्रादुर्भाव जिल्ह्यात मागील वर्षी मार्च महिन्यात घोलवड येथे प्रकाश अमृते यांच्या नारळ झाडांवर पहिल्यांदा प्रा. उत्तम सहाणे यांनी पहिला व जिल्ह्यात नोंद केली. याचा अहवाल कृषी विद्यापीठ दापोली येथे पाठवला होता.

नारळ पिकावरील समस्यांविषयी प्रशिक्षण : कृषी विज्ञान केंद्र कोसबाड आणि नारळ विकास बोर्ड पालघर यांच्यातर्फे नारळ पिकावरील विविध समस्यांविषयी जिल्हास्तरीय एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन कृषी विज्ञान केंद्र कोसबाड येथे नुकतेच केले होते. या वेळी कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ प्रा.उत्तम सहाणे आणि प्रा. भरत कुशारे यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा नारळ उत्पादक संघाचे अध्यक्ष यज्ञेश सावे, उपाध्यक्ष देवेंद्र राऊत यांच्यासह अनेक प्रगतिशील शेतकरी उपस्थित होते.

नारळ पिकावर उद्भवलेल्या स्पायरेलिंग पांढरी माशी आणि इतर किडींच्या व्यवस्थापनाविषयी प्रा.उत्तम सहाणे मार्गदर्शन करताना म्हणाले की, या समस्येविषयी सामूहिक व्यवस्थापनाची आवश्यकता आहे. बागायतीत मित्र कीटकांची संख्या वाढविण्यासह रासायनिकऐवजी जैविक कीटकनाशकांचा वापर आवश्यक आहे. तर प्रा. भरत कुशारे यांनी नारळ पिकामध्ये खत आणि पाणी व्यवस्थापन याबाबत माहिती दिली.

नारळ विकास बोर्डाचे उपसंचालक डॉ. देवनाथ यांनी नारळ उत्पादनातील समस्या आणि निवारण याविषयी मार्गदर्शन केले. प्रक्षेत्र अधिकारी शरद आगलावे यांनी पिकाची लागवड आणि प्रक्रि या याबद्दल शासकीय योजनांची माहिती दिली. या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील बागायतदार सहभागी झाले होते. त्यांनी विविध समस्यांबद्दल विचारलेल्या प्रश्नांना तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

या समस्येकरिता सामूहिक पद्धतीने व्यवस्थापन गरजेचे असून निम तेल ५ मि.लि. प्रति लिटरप्रमाणे फवारणी करावी. या किडीवर उपजीविका करणारे एन्कारशिया नावाचे मित्रकीटक शेतात वाढणे आवश्यक आहे. रासायनिक कीटकनाशकांचा वापर शक्यतो टाळून त्याऐवजी वनस्पतीजन्य आणि जैविक कीटकनाशकांचा वापर करावा.- उत्तम सहाणे, कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड, पीक संरक्षणशास्त्रज्ञ.

स्पायरेलिंग पांढरी माशीचा प्रभाव चिकू झाडांवर दिसू लागला आहे. या जिल्ह्याचे अर्थकारण चिकू बागांवर अवलंबून आहे. त्यामुळे तातडीने उपाययोजना न अवलंबल्यास चिकू बागायतदार देशोधडीला लागेल.- देवेंद्र राऊत (उपाध्यक्ष, जिल्हा नारळ उत्पादक संघ)

टॅग्स :Vasai Virarवसई विरारMaharashtraमहाराष्ट्र