तटरक्षक दलाचे जहाज भरकटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 05:44 IST2018-12-05T05:44:08+5:302018-12-05T05:44:10+5:30
नौदल दिनीच तटरक्षक दलाचे एक जहाज मंगळवारी दुपारी १.३० च्या सुमारास तांत्रिक बिघाडामुळे भरकटून भुईगाव किनाऱ्यावर आले होते.

तटरक्षक दलाचे जहाज भरकटले
वसई : नौदल दिनीच तटरक्षक दलाचे एक जहाज मंगळवारी दुपारी १.३० च्या सुमारास तांत्रिक बिघाडामुळे भरकटून भुईगाव किनाऱ्यावर आले होते.
तांत्रिक बिघाडामुळे जहाज किनाºयावर आणले, अशी माहिती नौदल अधिकाºयांनी दिली. हे जहाज अचानक इथे आल्यामुळे पोलीस तेथे पोहोचले. त्या वेळी जहाजात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती नौदल अधिकाºयांनी दिली. तसेच बिघाड दूर झाल्यानंतर हे जहाज येथून हलवण्यात येईल, असे सांगितले. मात्र किनाºयावर जहाज पाहून पर्यटक व स्थानिकांनी सेल्फी काढण्यासाठी येथे गर्दी केली होती.