शहरं
Join us  
Trending Stories
1
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
2
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
3
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
4
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
5
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
6
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
7
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
8
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
9
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
10
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
11
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक
12
ई-बस प्रवाशांसाठी STकडून मासिक, त्रैमासिक पास योजना सुरू; प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
13
महिलांसाठी आनंदाची बातमी! 'या' राज्यात आता १२ दिवसांची मासिक पाळी रजा मिळणार, सरकारची घोषणा
14
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
15
Nobel Prize : साहित्यातील नोबेल पुरस्काराची घोषणा, हंगेरीचे लास्झलो क्रास्नाहोरकाई ठरले मानकरी
16
Astro Tips: १० ऑक्टोबरला रात्री ठीक १० वाजून १० मिनिटांनी इच्छापूर्तीसाठी करा 'हे' काम!
17
बाजाराचं जोरदार कमबॅक! एका दिवसात गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फायदा, 'हे' शेअर्स होते टॉप गेनर्स
18
Smriti Mandhana World Record: 'वनडे क्वीन' स्मृतीची विश्व विक्रमाला गवसणी; २८ वर्षांनी असं घडलं
19
IAS Ambika Raina : कमाल! स्वित्झर्लंडची लाखोंची नोकरी सोडून स्वप्न केलं साकार; दोनदा अपयश, तिसऱ्यांदा झाली IAS
20
"कंटेनर वेगाने मागे आला असता तर...", अपघातातून थोडक्यात बचावली रुपाली भोसले, सांगितला भयानक प्रसंग

क्लायमेटकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

By admin | Updated: March 21, 2017 01:32 IST

क्लायमेट स्मार्ट व्हिलेज अंतर्गत १६ ते १८ जानेवारी व २० ते २३ फेबु्रवारी या कालावधीत शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन व चर्चासत्र शिबीर

जव्हार : क्लायमेट स्मार्ट व्हिलेज अंतर्गत १६ ते १८ जानेवारी व २० ते २३ फेबु्रवारी या कालावधीत शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन व चर्चासत्र शिबीर कोसबाडच्या कृषी विज्ञान केंद्रात आयोजिण्यात आले होते. ७० पेक्षा जास्त गावातील जवळपास ३५० शेतकऱ्यांनी यात सहभाग घेतला होता.बदलत्या वातावरणामुळे शेती व मानवी जीवनावर होणारे दुष्परिणाम व समस्या यांवर मात करण्यासाठी बोरलॉग इन्स्टीट्यूट फॉर साऊथ एशिया, प्रगती प्रतिष्ठान जव्हार आणि आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात कृषी व त्यावर आधारीत उद्योग याविषयावर मार्गदर्शन केले. यामध्ये पीक नियोजन, संरक्षण तसेच आळिंबी लागवड, कुक्कुटपालन, शेळीपालन, मधुमक्षिका पालन, गांडुळखत निर्मिती, फुल व भाजीपाला लागवड, मृद संधारण अशा विविध विषयांवर मार्गदर्शन लाभले. या दरम्यान शेतकऱ्यांनी विविध प्रश्न उपस्थित करून त्याबाबत सखोला माहीती घेतली. तसेच या शिबिराचा प्रमुख उद्देश म्हणजे हवामानाचे शेतीवर होणारे दुष्परिणाम व त्यावरील उपाययोजना याचे सुसुत्रीकरण हा होता. या बाबत शेतकऱ्यांशी बोलल्यानंतर त्यांना मिळालेले मार्गदर्शन हे एक प्रभावी व मोलाचे असून आम्ही या ज्ञानाचा निश्चितच वापर करू असे ते म्हणाले. या शिबिराबाबत शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करून आभार मानले आहेत. (वार्ताहर)