शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
8
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
9
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
10
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
11
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
12
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
13
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
14
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
15
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
16
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
17
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
18
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
20
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की

नालासाेपारा शहर बनते आहे नायजेरियन नागरिकांचा अड्डा? सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2020 00:02 IST

Nalasapara News : लॉकडाऊनच्या काळात अनेक नायजेरियन नागरिक बाहेरून नालासोपारा शहरात राहण्यास आले आहेत. त्यांच्याविराेधात पोलिसांनी कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

- मंगेश कराळेनालासोपारा : शहराच्या पूर्व आणि पश्चिमेला नायजेरियन नागरिकांचे अड्डे बनले आहेत. तुळिंज आणि नालासोपारा पोलीस ठाण्यांतर्गत अंदाजे दाेन ते तीन हजार नायजेरियन नागरिक बेकायदा राहत असल्याची चर्चा असून पाेलीस ठाण्यांत हाताच्या बाेटांवर माेजण्याइतक्याच नागरिकांची नाेंद आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेक नायजेरियन नागरिक बाहेरून नालासोपारा शहरात राहण्यास आले आहेत. त्यांच्याविराेधात पोलिसांनी कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, पाेलिसांनी बेकायदा खाेली भाड्याने देणाऱ्या घरमालकांना नाेटिसा देऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.नायजेरियनच्या गँग नालासोपारा शहरात सक्रिय असून अमली पदार्थ विक्री, फसवणूक, लॉटरी स्कीम, विनयभंग यांसारखे गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. नालासोपारा शहरात पूर्वेत आचोळे गाव, अलकापुरी, मोरेगाव, ओस्तवालनगर, प्रगतीनगर, रेहमतनगर तर पश्चिमेकडील हनुमाननगर या परिसरात नायजेरियन बेकायदा राहत आहेत. मात्र, तुळिंज पोलीस ठाण्यात १९ तर नालासोपारा पोलीस ठाण्यात दाेन नायजेरियन नागरिकांची नोंद आहे. काही नायजेरियन नागरिकांनी भारतीय महिलांशी विवाह करून येथे राहण्याची साेय केली आहे, तर मुंबईहून अमली पदार्थांच्या गुन्ह्यातून सुटून आल्यानंतर काहींनी बस्तान नालासोपारा शहरात मांडले आहे. जास्तीचे मिळणारे घरभाडे आणि वर्षभराची एकत्र रक्कम मिळत असल्याने त्यांना घरे भाड्याने दिली जात आहेत. त्यामुळे घरमालक आणि एजंटांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली जात आहे.मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयात सीआरपीसी १९७३ चे कलम १४४ (१) (२) अन्वये भाडेकरूंसंदर्भात विशेष माहिती संबंधित पोलीस ठाण्यांना कळविणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे लवकर काही भागांत विशेष शोधमोहीम घेऊन कारवाई सुरू केली जाणार आहे.     - प्रशांत वाघुंदे,              पोलीस उपायुक्त, झोन ३ ज्या नायजेरियन नागरिकांच्या नोंदी पोलीस ठाण्यात नाहीत, अशा घरमालक आणि दलालांवर कारवाई करणार. बेकायदा राहणाऱ्या नायजेरियन नागरिकांना आणि घरमालकांना नोटिसा देण्यास शनिवारपासून सुरुवात केली आहे.- जयकुमार सूर्यवंशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तुळिंज पोलीस ठाणेपोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन नायजेरियन नागरिक राहत असल्याची नोंद असून जे अनधिकृतपणे राहत आहेत किंवा त्यांना राहण्यासाठी सदनिका देत आहेत त्या घरमालकांना लवकरच नोटिसा देऊन कारवाई करणार आहे.- वसंत लब्दे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नालासोपारा पोलीस ठाणे  

टॅग्स :Vasai Virarवसई विरारCrime Newsगुन्हेगारी