जमिनीचा हिस्सा मागितला म्हणून चुलतीचा खून

By Admin | Updated: August 21, 2015 02:11 IST2015-08-21T02:11:48+5:302015-08-21T02:11:48+5:30

निहे-गोलीमपाडा येथील वडिलोपार्जित शेतजमिनीचा हिस्सा मागितल्याचा राग मनात धरून दोन मुले व वडिलांनी घरात घुसून संबंधित महिलेस काठीने बेदम

Chutti's blood as part of the demand for land | जमिनीचा हिस्सा मागितला म्हणून चुलतीचा खून

जमिनीचा हिस्सा मागितला म्हणून चुलतीचा खून

मनोर : निहे-गोलीमपाडा येथील वडिलोपार्जित शेतजमिनीचा हिस्सा मागितल्याचा राग मनात धरून दोन मुले व वडिलांनी घरात घुसून संबंधित महिलेस काठीने बेदम मारहाण करून जीवे मारले. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी बाजूला असलेल्या शेणखाईत (खड्ड्यात) मृतदेह फेकून दिला. मात्र, या तिघांपैकी एका आरोपीला पकडण्यात मनोर पोलिसांना यश आले आहे.
नरेश गोलीम आणि रामचंद्र गोलीम यांची गोलीमपाडा निहे येथे वडिलोपार्जित शेतजमीन आहे. त्या जमिनीच्या हिश्श्यावरून पूर्वीपासून दोघा कुटुंबीयांमध्ये वाद होता. नरेश व त्याची पत्नी ललीता यांनी रामचंद्र गोलीम यांच्याकडे दोन दिवस अगोदर जमिनीचा हिस्सा मागितला. त्यावरून मनात राग धरून रामचंद्र लहू गोलीम आणि त्यांची मुले भरत आणि शरद या तिघांनी बुधवारी दुपारी घरात कोणी नसल्याची संधी साधत घरामध्ये घुसून ललीता हिला काठीने मारहाण करून ठार मारले.
मनोर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला असून तिघांपैकी भरत रामचंद्र गोलीम (२२) यास अटक केले आहे. रामचंद्र लहू गोलीम (वडील), शरद रामचंद्र गोलीम (मुलगा) फरार आहेत. गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे. (वार्ताहर)

Web Title: Chutti's blood as part of the demand for land