माजी आमदार डॉमनिक घोन्सालविस यांच्या पत्नी ख्रिस्तीना घोन्सालविस यांचे  निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 14:43 IST2020-10-11T14:43:21+5:302020-10-11T14:43:30+5:30

अंत्यविधी सांडोर स्थित चर्च येथे रविवारी दुपारी मोजक्या आप्तेष्टांसोबत संपन्न झाला. 

Christina Ghonsalvis, wife of former MLA Dominic Ghonsalvis, has died | माजी आमदार डॉमनिक घोन्सालविस यांच्या पत्नी ख्रिस्तीना घोन्सालविस यांचे  निधन

माजी आमदार डॉमनिक घोन्सालविस यांच्या पत्नी ख्रिस्तीना घोन्सालविस यांचे  निधन

लोकमत न्यूज नेटवर्क

वसई : वसईचे माजी आमदार  तथा जनता दलाचे जेष्ठ नेते डॉमनिक घोन्सालविस यांच्या पत्नी ख्रिस्टीना घोन्सालविस यांचे रविवार ( दि.11 ) सकाळी अल्पशा आजाराने वयाच्या 82 व्या  वर्षी दुःखद निधन झाले.

 दरम्यान त्यांच्या पाश्च्यात पती माजी आमदार डॉमनिक घोन्सालविस,अॅलन,युरी,आणि रोहन अशी तीन मुले,सुना व  नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी सांडोर स्थित चर्च येथे रविवारी दुपारी मोजक्या आप्तेष्टांसोबत संपन्न झाला. 

माजी आमदार डॉमनिक घोन्साल्विस यांच्या सामाजिक ,शैक्षणिक आणि राजकीय वाटचालीत   त्यांच्या स्वर्गवासी पत्नी ख्रिस्तीना त्यांच्यामागे ठाम पणे उभ्या होत्या. ख्रिस्तीना घोन्सालविस यांच्या निधनाची वार्ता समजताच त्यांच्याबद्दल वसईचे बविआचे आमदार हितेंद्र ठाकूर,आम.क्षितिज ठाकूर,आम.राजेश पाटील, माजी महापौर राजीव पाटील ,नारायण मानकर, प्रवीण शेट्टी ,माजी आमदार विवेक पंडित यांनी तीव्र  दुःख व्यक्त केले आहे.

Web Title: Christina Ghonsalvis, wife of former MLA Dominic Ghonsalvis, has died