- लोकमत न्यूज नेटवर्कविरार : नालासोपारा येथील एका व्यक्तीने चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून एका दहा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उजेडात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. गुरुवारी दुपारी आरोपीने तिला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने डांगेवाडी येथील एका बिल्डिंगच्या रूममध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार कळल्यानंतर तिच्या पालकांनी काल रात्री फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.
चॉकलेटच्या आमिषाने बालिकेवर अत्याचार
By admin | Updated: May 20, 2017 02:01 IST