‘मेड इन पीआरसी’चा चिनी कोड

By Admin | Updated: October 27, 2016 03:35 IST2016-10-27T03:35:23+5:302016-10-27T03:35:23+5:30

दिवाळी म्हटंली म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा सण. या निमीत्ताने घराघरातुन खरेदी केली जाते. खास करुन मिठाई, फटाके, आकाश कंदील, रोषणाईकड ेअधिक लक्ष दिले

Chinese code of 'Made in PRC' | ‘मेड इन पीआरसी’चा चिनी कोड

‘मेड इन पीआरसी’चा चिनी कोड

विक्रमगड : दिवाळी म्हटंली म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा सण. या निमीत्ताने घराघरातुन खरेदी केली जाते. खास करुन मिठाई, फटाके, आकाश कंदील, रोषणाईकड ेअधिक लक्ष दिले जाते़ त्या दृष्टीने बाजारपेठाही सजतात़ मात्र गेल्या काही वर्षापासुन या बाजारपेठांवर चायनामेड वस्तूंनी आक्रमण केल्याचे च दिसत आहे़ देशात चिनी वस्तूंविरोधी वातावरण असल्याने चायना मार्केटने भारतीयांना चकवा दिला आहे. मेड इन चायना लिहिले असले की, ती वस्तू नाकारली जाईल हे हेरुन त्या जागी ‘मेड इन पीआरसी’ असा कोड वापरण्यात आला आहे.
महागाई वाढली असली तरी खरेदी दांरामध्ये फारसा फरक पडलेला दिसण्यात येत नाही. ़दिवाळी सणासाठी गोड-धोंड, फराळ, मिठाई, फटाका, आकाशकंदील, पणत्या, रांगोळया, दिव्यांनाही दरवर्षीप्रमाणे मागणी आहेच़ दरवर्षी दिवाळीत पारंपारीक आकशकंदील दिसायचे. मात्र, गेल्या काही वर्षापासुन वैशिष्टय आणि वैविध्यपूर्ण आकाश कंदीलांची चलती आहे़ या वर्षीतर खास चिनी वस्तंूबरोबर चिनी आकाशकंदीलांनाही बाजारपेठा सजल्या आहेत़
कमी किंमत आणि दिसयला आकर्षक असे हे चिनी आकाशकंदील ग्राहकांच्या पसंतीला उतरत आहेत़ कापडाच्या विविध आकरांमधील हे आकाश कंदील स्वस्त असल्याने ग्राहकांचा ओढा तिकडे आहे. ५० रुपयांपासुन ते ५०० रुपयांपर्यत त्यांचे दर आहेत़ परंपरा जपणारे प्लॉस्टीक आणि कागदी आकाशकंदीलांना जास्त पसंती आहे़ देवदेवता, विश्वचषक, कार्टून, कमळ, गोलसिलेंडर, अंडाकृती, चायनाबलून, फुलपाखरे अशा विविध आकारांत उपलब्ध असलेले आकश कंदील ग्राहकांना आकर्षित करत आहेत़ वारली पेटिंगची कलाकुसर केलेले आकाश कंदीलही उपलब्ध झालेलआहेत़
चिनी आकाशकंदीलासोबत इतर वस्तू तोरणांनीही बाजार सजला आहे़ आकर्षक डिझाईन आणि सामान्यांना परवडतील अशा दरातील तोरणे उपलब्ध असल्याने ग्राहकांचा कल त्याकडे वाढला आहे़ ५० ते २००, ३०० रुपयांपर्यत याची किंमत आहे़ . पणत्यामंध्ये साधे, दिवे, फॅन्सीदिवे, स्टॅण्ड असलेले सजावट केलेल्या पणत्या, पणत्यांची माळ असे विविध आकारातील पणत्या ग्राहकांसमोर उपलब्ध आहेत़ या माळा सध्या ५० रुपये पासुन ३०० रुपयांपर्यत आहेत़ (वार्ताहर)

रांगोळी शिवाय दिवाळीला महत्व नाही, वेगवेगळया रंगांची आणि रांगोळी मिश्रीत रंगाची पाकिटे ५ ते १० रुपये पासुन उपलब्ध आहेत़ पारंपारीक रांगोळी सोबतच आता संस्कारभरतीची, धान्यांची, फुलांची, पाण्यावरची व फ्री हॅड रांगोळीही काढली जाते़
चाळणीच्या जाळीवर विविध डिझाईन असलेल्या रांगोळीचे छापदेखील बाजारात आहेत़ त्यांची किंमत १५ ते २० रुपये आहे़ या शिवाय रांगोळी पुस्तके व रांगोळीच्या स्टीकरनाही मागणी आहे़ दरम्यान, दिवाळीवरही महागाईचे संकट आहेत़
दिवाळीसाठी असलेल्या वस्तुंचे भाव २० टक्कयांनी वाढलेल आहेत़ मात्र सण म्हटंला म्हणजे खरेदीही आलीच मग महाग का असेना़

Web Title: Chinese code of 'Made in PRC'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.