शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
3
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
4
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
5
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
6
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड
7
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
8
Storage Technologies and Automation : पहिल्याच दिवशी शेअरची किंमत दुप्पट; ₹७८ चा 'हा' स्टॉक पोहोचला ₹१५५ पार
9
भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...  
10
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
11
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
12
गुगल वॉलेटची भारतात एंट्री! जाणून घ्या 'Google Pay'पेक्षा किती वेगळी असेल
13
Shakib Al Hasan ने सेल्फीसाठी आलेल्या चाहत्याची मान धरली, मारण्यासाठी हात वर केला, Video Viral 
14
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
15
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
16
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
17
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
18
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
19
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
20
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?

चिमुकल्यांचा एक लाख सीड बॉल्सचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2021 11:46 PM

डाेंगर पुन्हा हाेणार हिरवेगार

लोकमत न्यूज नेटवर्क विक्रमगड : कधीकाळी घनदाट वनसंपदा अस्तित्वात असलेल्या पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड आणि वाडा या तालुक्यांतील जंगले बेसुमार वृक्षतोड आणि नागरीकरणामुळे झपाट्याने नामशेष होत आहेत. या भागातील वनसंपदा पुन्हा फुलवण्यासाठी केशवसृष्टी ग्रामविकास संस्थेच्या ५० गावांतील माधव संस्कार केंद्रातील चिमुकले विद्यार्थी जूनपर्यंत सुमारे एक लाख सीडबॉल्स तयार करण्याचे ध्येय समोर ठेवले आहे.  जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड आणि वाडा हे दुर्गम तालुके पावसाळ्यात हिरव्यागार वनश्रीने नटलेले असतात, मात्र, दिवाळीनंतर नद्यांचे पाणी आटताच हाच भाग भकास होऊन डोंगर-टेकड्या बोडक्या होतात. काही वर्षांपूर्वी  या दुर्गम आदिवासी तालुक्यात विपुल वनसंपदा अस्तित्वात होती. अनेक कारणांनी या वनस्पतींचा ऱ्हास झाला आणि हा परिसर भकास झाला. या परिसरात मागील १० वर्षांपासून ग्रामविकासाचे काम करणाऱ्या केशवसृष्टी ग्रामविकास संस्थेने आपल्या ५० गावांत सुरू असलेल्या माधव संस्कार केंद्रातील चिमुकल्यांच्या साहाय्याने पुन्हा या भागात विपुल प्रमाणात वनश्री फुलविण्याचा ध्यास घेतला आहे. ओहोळ आणि पाणवठ्याच्या जागी हे चिमुकले एकत्र येऊन माती आणि शेणखत यांचे गोळे बनवून त्यामध्ये झाडांच्या बिया पेरून सीडबॉल्स बनविण्याचे काम करत आहेत. 

गेल्या वर्षीच्या ९० टक्के झाडांची वाढ सर्व सीड्स बॉल्स पाऊस सुरू होताच डोंगर आणि टेकड्यांवर फेकण्यात येणार आहेत. मागील वर्षी याच मुलांनी जवळपास ३५ हजार सीडबॉल्स तयार करून टाकले हाेते. त्यापैकी ९० टक्के झाडे दाेन फुटांपर्यंत वाढल्याची माहिती शिक्षण विभागप्रमुख कैलास कुरकुटे यांनी दिली.

शिक्षक करत आहेत मार्गदर्शनया विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या मदतीने साग, ऐन, हिरडा, बेहडा, आवळा, चिंच, शिसव, पांगारा, बहावा, बाभूळ, पळस, वड, पिंपळ, उंबर, सादडा, खैर,उंबर यासारख्या जंगली झाडांच्या बिया एकत्र करून त्याचे सुमारे एक लाख सीड्स बॉल्स तयार करण्याच्या कामात हात गुंतले आहेत.