शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

डहाणूतील मिरची उत्पादकांचे होतेय कोट्यवधींचे नुकसान, शेतकरी हतबल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2021 11:38 PM

बाजारपेठेत शंभर रुपये किलो भावाने विकली जाणारी ढोबळी मिरची दलालांकडून केवळ दहा रुपयाने खरेदी केली जात असल्याने त्या भावात मजुरीदेखील सुटत नाही

शौकत शेखलोकमत न्यूज नेटवर्क डहाणू : डहाणूच्या पश्चिम किनारपट्टीवरील चिंचणी, वाणगाव, वाढवण, चंडीगाव, आसनगाव, बावडा, केतखाडी, तनाशी आदी भागात ढोबळी मिरचीचे विक्रमी उत्पादन घेतले जाते. येथील प्रसिद्ध ढोबळी मिरची खासकरून मुंबई, राजस्थान तसेच दिल्ली, जयपूर येथे मोठ्या प्रमाणात रोजच्या रोज पाठविली जात होती. परंतु ऐन हंगामात कोरोनामुळे मुंबई, दिल्ली येथे मुख्य भाजीपाला मार्केट बंद झाल्याने येथील शेतकऱ्यांच्या पायाखालची वाळूच सरकली असून, त्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.

बाजारपेठेत शंभर रुपये किलो भावाने विकली जाणारी ढोबळी मिरची दलालांकडून केवळ दहा रुपयाने खरेदी केली जात असल्याने त्या भावात मजुरीदेखील सुटत नाही. यामुळे बागायतदारांनी ढोबळी मिरचीच्या संपूर्ण बागा मोकाट गुरे तसेच बकऱ्यांच्या हवाली केल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू येत आहे. मुंबई शहराला भाजीपाला पुरवठा करण्यात सिंहाचा वाटा असलेल्या डहाणूच्या बंदरपट्टी भागातील शेतकरी बागायतदार कर्जबाजारी झाले आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सरकारने गेल्या वर्षभरापासून लॉकडाऊन, संचारबंदी, वाहतूकबंदी, रेल्वेबंदी, आयात-निर्यात बंदी, मास्क बांधणे, सुरक्षित अंतर ठेवणे, शाळाबंदी, व्यवसायबंदी अशा विविध उपाययोजना केल्याने त्याचा सर्वाधिक फटका पालघर जिल्ह्यातील ढोबळी मिरची, भाजीपाला, चिकू, नारळ, आंबे, पेरू, लिचीबरोबरच विविध प्रकारची फुले, भात लागवड अशा कृषी उत्पादकांना बसला आहे. त्याबरोबरच शेती-बागायतीमध्ये काम करणाऱ्या मजुरांवरदेखील उपासमारीची वेळ आलेली आहे.

येथील पश्‍चिम किनारपट्टीवर डहाणू, चिंचणी, वाणगाव भागात प्रामुख्याने रब्बी हंगामात नवनवीन तंत्रज्ञानाच्या वापराबरोबरच नेट शेड, पॉलिहाऊसचा वापर करून व महागडी संकरित मिरची व ढोबळी मिरचीच्या बियाणांचा वापर करून भरघोस उत्पादन घेतले जाते. ते मुंबई, दिल्ली, कोलकाता तसेच परदेशातही पाठविण्यात येते; मात्र गेल्या वर्षापासूनच्या दोन हंगामात कोरोना टाळेबंदी, वाहतूकबंदी, संचारबंदीमुळे कृषी उत्पादन होऊनही त्याला गिऱ्हाईक नसल्याने मागणीच  नाही.

व्यापाऱ्यांकडून फसवणूकnऐन हंगामात कोरोनामुळे मुंबई, दिल्ली येथे भाजीपाला मार्केट बंद झाल्याने येथील शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. उत्पादन खर्चापेक्षा अगदी अल्प किमतीने बागायतदारांना मालाची विक्री करावी लागते. आता तर दिल्लीसारख्या ठिकाणी मिरची जाणे बंद झाल्याने दहा-बारा रुपये किलोप्रमाणे मिरची, ढोबळी मिरची शेतकऱ्यांना विकावी लागत आहे. nयामुळे शेतकऱ्यांचा झालेला खर्चही सुटत नाही. काही बागायतदारांनी तर मिरची बागेत गुरे, बकरी घालायला सुरुवात केली आहे. थोडीफार मिरची व्यापारी नेतात, मात्र ते अल्प भाव देऊन बागायतदारांची फसवणूक करीत आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpalgharपालघर