शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

चिकू उत्पादक पीकविम्याच्या लाभापासून अद्याप वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2020 00:08 IST

Vasai-Virar News : विम्याचा लाभ मिळणार अथवा नाही, याबाबत ३० सप्टेंबरपर्यंत कळविणे बंधनकारक होते. मात्र, दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही त्याची दखल न घेतल्याने बागायतदारांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

बोर्डी - मृगबहारासाठी शासनाने ठरवून दिलेल्या निकषांनुसार चिकू पीकविमा बागायतदारांनी उतरविला होता. विम्याचा लाभ मिळणार अथवा नाही, याबाबत ३० सप्टेंबरपर्यंत कळविणे बंधनकारक होते. मात्र, दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही त्याची दखल न घेतल्याने बागायतदारांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पालघरचे जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसाळ यांची भेट घेऊन महाराष्ट्र राज्य चिकू उत्पादक संघाने निवेदन सादर करून तत्काळ विमा मिळण्यासाठी मागणी केली आहे.पालघर जिल्ह्यात २०२०-२१ ते २२-२३ या तीन वर्षांकरिता चिकू पिकाला प्रधानमंत्री फळपीक विमा योजनेतील पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेचा लाभ मृग बहारासाठी मिळाला आहे. याकरिता ३० जून या अंतिम तारखेस ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल केले होते. पालघर जिल्ह्यात भारतीय कृषी विमा कंपनीकडून हे काम पाहिले जात आहे.१ जुलै ते ३० सप्टेंबर या कलावधीत १० दिवस ९० टक्के आर्द्रता आणि २० मिमी पाऊस सलग आठ दिवस असल्यास विमा संरक्षित रक्कम ६० हजार आहे, तर पाच दिवस ९० टक्के आर्द्रता आणि २० मिमी पाऊस चार दिवस असल्यास ही रक्कम २७ हजार आहे. एका शेतकऱ्याला चार हेक्टरपर्यंतचा विमा भरण्याची मर्यादा घालून दिली होती. ३० सप्टेंबरअखेर विमा मंजूर झाला अथवा नाही. झाल्यास कोणत्या मंडळात किती टक्के विमा रक्कम मंजूर झाली, हे सांगणे आवश्यक होते. त्याची घोषणा डिसेंबरचा पहिला पंधरवडा उगवला, तरी त्याची घोषणा न झाल्याने शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. फायटोपथोरा हा बुरशीजन्य रोग आणि आठ-दहा वर्षांपासून डहाणू तालुक्यातील वाढते प्रदूषण इत्यादीमुळे चिकू उत्पादनात होणारी घट हाेत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी विम्याविषयी निवेदनाची दखल घेत, तत्काळ चौकशीचे आदेश दिल्याचे संघाचे अध्यक्ष विनायक बारी यांनी सांगितले. सहा तालुक्यांचा समावेशडहाणू तालुक्यातील डहाणू, चिंचणी, सायवन, कासा, मल्याण या महसुली मंडळांचा समावेश आहे, तर पालघर तालुक्यातील पालघर, बोईसर, तारापुर, मनोर, सफाळे, आगरवाडी, तसेच वसई तालुक्यातील वसई, विरार, माणिकपूर, निर्मळ, आगाशी, मांडवी. वाडा तालुक्यातील वाडा, कंचाड, कोने, कुडूस तर तलासरी तालुक्यातील तलासरी, झरी. विक्रमगड तालुक्यातील विक्रमगड, तलवाडा अशा २५ महसूल मंडळांचा चिकू फळपीक विमा योजनेत समावेश आहे.

टॅग्स :agricultureशेती