मुख्यमंत्री सडक तलासरीत वाहून गेली
By Admin | Updated: June 28, 2017 03:08 IST2017-06-28T03:08:24+5:302017-06-28T03:08:24+5:30
मुख्यमंत्री सडक योजनेतून बनविण्यात आलेली सडक तलासरीत पडलेल्या पहिल्याच पावसात वाहून गेली, दोन महिन्या पूर्वीच बनविण्यात

मुख्यमंत्री सडक तलासरीत वाहून गेली
लोकमत न्यूज नेटवर्क
तलासरी : मुख्यमंत्री सडक योजनेतून बनविण्यात आलेली सडक तलासरीत पडलेल्या पहिल्याच पावसात वाहून गेली, दोन महिन्या पूर्वीच बनविण्यात आलेला वडवली सवणे कवाडा रस्ता तात्काळ उखडला या बाबत दैनिक लोकमत च्या दि.२१ जूनच्या अंकात मुख्यमंत्री सडक उखडली या मथळ्या खाली बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती, तलासरी परिसरात दोन दिवसांपासून पडणाऱ्या संततधार पावसाने ही उखडलेली मुख्यमंत्री सडक पूर्णत: वाहून गेल्याने या रस्त्यावरील वाहतूक बंद पडली आहे , तसेच रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या वाहनांना धोका निर्माण होऊन अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे
पालकमंत्री विष्णू सवरा यांनी थाटामाटात भूमिपूजन करून हा रस्ता बनविण्यात आला होता.