मुख्यमंत्री आज तलासरीत
By Admin | Updated: May 18, 2017 06:44 IST2017-05-18T02:39:19+5:302017-05-18T06:44:58+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरूवारी तलासरीच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा कार्यक्रम पुढील प्रमाणे असेल. मुंबई येथून ठक्कर बाप्पा अनुदानीत आश्रमशाळेच्या परिसरात आगमन

मुख्यमंत्री आज तलासरीत
- लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर/तलासरी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरूवारी तलासरीच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा कार्यक्रम पुढील प्रमाणे असेल.
मुंबई येथून ठक्कर बाप्पा अनुदानीत आश्रमशाळेच्या परिसरात आगमन व पाहणी करून तेथून ते मौजे सावरोलीकडे प्रयाण करतील.
तिथे कृषी सिमेंट नाला बंधारा अधिक गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार यांची पाहणी, तसेच जि.प. च्या लघुपाटबंधारे विभागाअंतर्गत बंधाऱ्याच्या दुरूस्तीची पाहणी, तेथून मौजे उधवायेथील मागेल त्याला शेततळे या योजनेच्या अंमलबजावणीची पाहणी करतील. त्यानंतर तेथील प्राथमिक आरोग्य केंद्र, आश्रमशाळेला भेट देणार आहेत. तसेच तलासरीच्या पंचायत समिती सभागृहात आढावा बैठक घेऊन मुख्यमंत्री मुंबईकडे प्रयाण करतील.