महाराष्ट्रात होणार भाजपाचा मुख्यमंत्री
By Admin | Updated: October 19, 2014 19:27 IST2014-10-19T19:27:23+5:302014-10-19T19:27:23+5:30
पुढील मुख्यमंत्री भाजपाचा होणार असून कोणाच्या गळयात मुख्यमंत्रीपदाची माळ पडतेय हे भाजपाच्या कोअर कमिटीनंतर स्पष्ट होईल.
महाराष्ट्रात होणार भाजपाचा मुख्यमंत्री
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.१९ - महाराष्ट्र विधानसभेत स्वतंत्र लढणा-या भाजपाने अपेक्षितपणे यश मिळवले आहे. पुढील मुख्यमंत्री भाजपाचा होणार असून कोणाच्या गळयात मुख्यमंत्रीपदाची माळ पडतेय हे भाजपाच्या कोअर कमिटीनंतर स्पष्ट होईल.
२८८ जागासाठी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक १२३ जागेवर विजय मिळविला आहे. तर ६३ जागा मिळवित शिवसेना दुस-या क्रमांकावर राहिला आहे. काँग्रेसला ४२ तर राष्ट्रवादीला ४१ जागा मिळाल्या असून १८ जागा इतरांना मिळाल्या असून राज ठाकरे यांच्या मनसेला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. यंदाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच पंचरंगी लढत पाहायला मिळाली. या निवडणुकीत मतदारांनी अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव केला. यामध्ये काँग्रेसचे निवडणूक प्रचार प्रमुख नारायण राणे, नवी मुंबईचे गणेश नाईक, मराठवाडयातील सुरेश धस यांना पराभव पत्कारावा लागला. महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस हे प्रमुख दावेदार असून विनोद तावडे व गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आमदार पंकजा मुंडे यांच्या नावाची सुध्दा चर्चा आहे.