शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

बीईओ विरोधात मुख्यमंत्री, अधिकाऱ्यांकडे केली तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 12:22 AM

शिक्षकांकडे विविध कामाकरिता पैशाची मागणी करण्यात येत असल्याची तक्रार मुख्यमंत्री, कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे.

तलासरी : येथील पंचायत समितीमधील गट शिक्षण अधिकारी सदानंद जनाथे यांच्या विरोधात शिक्षकाकडून, अर्जाद्वारे शिक्षकांची पिळवणूक व गळचेपी तसेच शिक्षकांकडे विविध कामाकरिता पैशाची मागणी करण्यात येत असल्याची तक्रार मुख्यमंत्री, कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे.पदवीधर शिक्षक विजयकुमार शिवलिंगप्पा गोणगे यांनी कशा प्रकारे तलासरी गटशिक्षण अधिकारी शिक्षकांना वागणूक देऊन, पैशाची मागणी करतात याचा पाढाच अर्जाद्वारे वाचला आहे. तर पैशाची मागणी केलेला स्वत: तयार केलेला व्हिडिओ ही सोशल मीडियात वायरल झाल्याने शिक्षण विभागातील आर्थिक गैरव्यवहार चव्हाट्ट्यावर आला आहे.पदवीधर शिक्षक गोणगे यांची तलासरी येथून आंतरजिल्हा बदली मुखेड नांदेड येथे २०१४ मध्ये झाली होती. त्यानंतर उच्च न्यायालय औरंगाबाद येथे त्यांचा दावा सुरू होता. न्यायालयाने त्याचा निकाल दिल्यानंतर आॅक्टोबर २०१८ मध्ये पुढील कामासाठी अंतिम पगार पावती आवश्यक होती. मात्र, ती शिक्षक गोणगे यांच्याकडून गहाळ झाल्याने त्यांनी द्वितीय प्रत प्राप्त व्हावी यासाठी तलासरी पंचायत समिती शिक्षणाधिकाºयाकडे रीतसर अर्ज केला होता. मात्र, अंतिम पगार पावतीची द्वितीय प्रत देण्यासाठी १० हजाराची मागणी शिक्षणाधिकारी जनाथे यांनी केल्याचे त्यांनी नमूद करीत ५ हजार रुपये स्विकारूनही अंतिम पगार पावती न देता उर्वरित रक्कमेसाठी तगादा लावल्याचे नमूद करीत हा अर्ज मुख्यमंत्री, कोंकण विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना केला आहे.गोणगे यांनी केलेल्या अर्जामध्ये जनाथे यांनी आॅफिसच्या कामाच्या नावाखाली तालुक्यातील काही शिक्षकांना कार्यालयात बसवून व हाताशी धरून शिक्षकांकडून पैसे वसुली दलाल बनविल्याचे पत्रात उल्लेख केला आहे. जनाथे हे शिक्षकांची तपासणी किंवा शिक्षक अडचणीत असेल अशा वेळी त्यांच्याकडून अडचण दूर करण्याच्या नावाने अव्वाच्या सव्वा पैश्याची मागणी करून लूट करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.।याबाबत तक्र ार अर्ज आला होता, व्हिडिओ क्लिपची सत्यतता तपासून त्याबाबत योग्य चौकशी करून दोषी असल्यास कारवाई करण्यात येईल.-राहुल म्हात्रे,गटविकास अधिकारी, तलासरी।याबाबत गटविकास अधिकाºयांकडे खुलासा सादर केला आहे. जिल्हा बदली नंतर एलपीसी देण्यात आली होती, परंतु आता जी माहिती मागत आहे ती खोटी मागत आहे. दुसºयांदा एलपीसी देता येत नाही. ती येथील कार्यालया मार्फत सदर शिक्षक ज्या जि. परिषदेच्या अंतर्गत असेल त्याठिकाणी देण्यात येते.- सदानंद जनाथे, गटशिक्षणाधिकारी तलासरी