तपासणी नाक्यावर ठिय्या

By Admin | Updated: November 11, 2016 02:50 IST2016-11-11T02:50:00+5:302016-11-11T02:50:00+5:30

पाचशे व हजाराच्या नोटा सरकारने रद्द केल्यानंतर आज सकाळी तलासरीत बँका उघडताच बँका समोर नोटा बदलण्यासाठी ग्राहकांच्या रांगा लागल्या तर दापचरी

Check stops at the nose | तपासणी नाक्यावर ठिय्या

तपासणी नाक्यावर ठिय्या

सुरेश काटे, तलासरी
पाचशे व हजाराच्या नोटा सरकारने रद्द केल्यानंतर आज सकाळी तलासरीत बँका उघडताच बँका समोर नोटा बदलण्यासाठी ग्राहकांच्या रांगा लागल्या तर दापचरी तपासणी नाक्यावर वाहतूक कोंडीत सापडलेल्या वाहन चालकांनी तपासणी नाक्यावर ठिय्या देऊन वाहने सोडण्यास भाग पाडले. तलासरीतील बँका समोर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या, परंतु या बँका मध्ये पाचशे हजाराच्या नोटा खात्यात जमा केल्या जात होत्या ग्राहकांना त्या बदल्यात पुरेसा पैसा नसल्याने कमी रक्कम दिली जात होती.
बँका समोर ग्राहकांची गर्दी असली तरी बाजार पेठेत ग्राहकांची गर्दी नाही पाचशे हजाराची नोट घेऊन सामान द्यावे तर सुट्या पैशाचेही वांधे त्यामुळे व्यापारीही हैराण झाले आहेत.
नोटा बदलण्यासाठी सकाळ पासून लागलेल्या रांगा दुपारी चार वाजले तरी संपल्या नव्हत्या भर उन्हात लोक नोटा बदलण्यासाठी उभे होते पेट्रोल पंपावर मात्र काल सारखी गर्दी नव्हती.दापचरी तपासणी नाका येथे काल पासून वाहनाच्या प्रचंड रांगा लागल्या असल्याने वाहन चालक हैराण झाले आहेत सर्व टोल नाक्यावर टोल माफी दिली असताना दापचरी तपासणी नाक्यावर कर वसुली सुरु आहे त्यातच पाचशे हजाराची नोटा न घेता सुट्या पैशांच्या मागणीमुळे वाहन चालक व अधिकारी यांच्यात वादावादी व वाहतूक कोंडी यामुळे तपासणी नाक्यावर हैराण झालेल्या वाहन चालकांनी ठिय्या देऊन आंदोलन केल्याने व परिस्थिती चिघळत आहे हे पाहून नाक्यावरून कर न घेता वाहने सोडून वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी केला. (वार्ताहर)

Web Title: Check stops at the nose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.