तोतया पोलिसांकडून फसवणूक
By Admin | Updated: July 15, 2014 01:02 IST2014-07-15T01:02:49+5:302014-07-15T01:02:49+5:30
सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून तीन तरुणांनी वृद्धाचे दागिने लुटले. पहाटे साडेचारच्या सुमारास भांडुपच्या भट्टीपाडा परिसरात ही घटना घडली

तोतया पोलिसांकडून फसवणूक
मुंबई : सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून तीन तरुणांनी वृद्धाचे दागिने लुटले. पहाटे साडेचारच्या सुमारास भांडुपच्या भट्टीपाडा परिसरात ही घटना घडली. भांडुपला राहणारे दिनक सोनावणे (५८) धुळ्याहून घरी परतत होते. पहाटे भट्टीपाडा परिसरातून पायी जात असताना तिघांनी त्यांना अडवले. आम्ही सीबीआय अधिकारी असून पुढे तपासणी सुरू आहे, दागिने काढून ठेवा, असा दम सोनावणेंना दिला. दागिने काढून बॅगेत भरण्यात मदत करण्याच्या निमित्ताने या तिघांनी हातचलाखी करून सोनावणेंचे ४१ हजार रुपयांचे दागिने स्वत:कडे घेत पळ काढला. याप्रकरणी भांडुप पोलिसांनी या तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. (प्रतिनिधी)