पालघरमध्ये नोकरीच्या आमिषाने फसवणूक
By Admin | Updated: May 7, 2016 00:45 IST2016-05-07T00:45:51+5:302016-05-07T00:45:51+5:30
आपल्या सार्वजनिक बांधकाम विभाग अंधेरी (मुंबई)मध्ये नोकरी मिळवून देतो असे सांगून पालघरमधील कपिल मधूसुदन पाटील, रा. माहीम रोड, पालघर यांच्याकडून ७ लाख २ हजाराची

पालघरमध्ये नोकरीच्या आमिषाने फसवणूक
पालघर : आपल्या सार्वजनिक बांधकाम विभाग अंधेरी (मुंबई)मध्ये नोकरी मिळवून देतो असे सांगून पालघरमधील कपिल मधूसुदन पाटील, रा. माहीम रोड, पालघर यांच्याकडून ७ लाख २ हजाराची रक्कम घेऊन त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी कनिष्ठ लिपिक भरत लक्ष्मण शेलार यांच्या विरोधात पालघर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्रानुसार पालघर माहीम रस्त्यावरील जय संतोषी अपार्टमेंटमध्ये राहणारे फिर्यादी कपिल पाटील हा १२ वी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने बिल्डिंग सुपरवाझरचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्याने एका वृत्तपत्रात सार्वजनिक बांधकाम विभाग अंधेरी येथील कार्यालयात स्थापत्य अभियांत्रिकी सहायक गट (क) ची जागा भरण्यासंदर्भात जाहीरात प्रसिद्ध झाली होती. दरम्यान, फिर्यादीचा भाऊ हा आरोपी भरत शेलार याच्याशी ओळख होती. आपण अंधेरी सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी करीत असून कपिल यास नोकरीस लावण्यासाठी ७ लाख रुपये द्यावे लागतील असे त्यांनी सांगितले. आरोपीने हप्त्याहप्त्याने फिर्यादीकडून ७ लाख २ हजाराची रक्कम स्वीकारल्याचे पोलिसांनी सांगितले.
मुंबई येथील स्थापत्य अभियांत्रिकी सहायक गट या संदर्भातील लेखी परीक्षा पार पाडल्यानंतर आरोपी सर्व रक्कम स्विकारली असताना आपल्याला नोकरी संदर्भात आपल्याला कॉल येईल या आशेवर बरेच महिने निघून गेले. परंतु आपल्याला कॉल आला नसल्याने त्याने पालघर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. (प्रतिनिधी)
उडवाउडवीची उत्तरे
आपली पुरती फसगत झाल्याचे कपिलच्या लक्षात आले. दरम्यान, आरोपी भरत शेलार याची तुर्भे (नवी मुंबई) येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात बदली झाली होती. तेथे त्याची भेट घेतल्यानंतर तो उडवाडवीची उत्तरे देऊ लागला. आपली फसगत झाल्यानंतर फिर्यादीने सरळ पालघर पोलीस स्टेशन गाठून फिर्याद नोंद केली.
तरी अटक नाही
पालघर पोलीस स्टेशनचे पो. नि. जय पाटील यांनी आरोपी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. परंतु आरोपी कामावर हजर होत नसल्याने अजूनही आरोपीला अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.