शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

भाजपपुढे संख्याबळ टिकवण्याचे आव्हान, सर्वच पक्षांच्या उमेदवारांची धाकधूक वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 00:14 IST

राज्यात सत्तेपासून शिवसेनेने भाजपला दूर ठेवल्याचा फटका जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत बसण्याची शक्यता असून २१ जागा टिकविण्याचे आव्हान भाजपपुढे उभे आहे.

हितेन नाईकपालघर : राज्यात सत्तेपासून शिवसेनेने भाजपला दूर ठेवल्याचा फटका जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत बसण्याची शक्यता असून २१ जागा टिकविण्याचे आव्हान भाजपपुढे उभे आहे. तर, दुसरीकडे सेनेच्या उमेदवारी देण्यावरून अंतर्गत निर्माण झालेली नाराजी दूर करण्यात सेनेला किती यश मिळते यावर संख्यावाढीचे गणित अवलंबून राहणार आहे.पालघर जिल्हा परिषदेत एकूण ५७ सदस्यांपैकी भाजपकडे २१ सदस्य, शिवसेना १५+१ ( सेना बंडखोर अपक्ष) १६ ,बविआ १०, माकप ५, राष्ट्रवादी ४ काँग्रेस १ असे बलाबल होते. भाजपच्या २१ सदस्यांपैकी बोईसर ३, वाडा २, डहाणू ५, मोखाडा १, विक्रमगड ४, जव्हार ३, तलासरी ३ असे सदस्य निवडून आले होते. शिवसेनेच्या १६ सदस्यांपैकी पालघर ८, वसई १, वाडा ४, विक्रमगड १, जव्हार १, मोखाडा १ असे सदस्य निवडून आले होते. बविआच्या १० पैकी वसई ३, डहाणू २, पालघर ५ सदस्य निवडून आले होते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ५ सदस्यांपैकी डहाणू २, तलासरी २ व जव्हार १, राष्ट्रवादीच्या ४ जागांपैकी डहाणू २, पालघर १, मोखाडा १ तर काँग्रेसचे डहाणूमधून १ असे ५७ सदस्य निवडून आले होते.राज्यात स्थापन झालेली भाजपची सत्ता अल्पकाळाची ठरल्याने तर दुसरीकडे जिल्ह्यात एकही खासदार, आमदार नसल्याने भाजप ची पुरती कोंडी झाल्याने २०१५ च्या जिल्हा परिषदेमध्ये मिळालेले २१ सदस्यांचे संख्याबळ टिकविण्याचे आव्हान भाजप पुढे उभे आहे. पूर्वी विष्णू सवरांच्या रूपाने एक पालकमंत्री, राजेंद्र गावितांच्या रूपाने खासदार तर जिल्हाध्यक्ष तथा आमदार म्हणून पास्कल धनारे अशी ताकद भाजपकडे होती.आता झालेल्या निवडणुकीत त्यांचा खासदार ही सेनेकडे गेल्याने व एकही आमदार निवडून न आल्याने त्यांची राजकीय ताकद संपलेली आहे. त्यातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी व नव्याने भाजपमध्ये असलेल्या जुन्या नवीन पदाधिकारी यांच्यातील वाद नव्याने निर्माण झाल्याने त्याचाही फटका भाजप ला बसू शकतो.राष्ट्रवादीचे आमदार निवडून आलेल्या मोखाडा, जव्हार, विक्रमगड व वाडा या गटात एकूण १८ सदस्य आहेत. वाड्यात भाजप २ व सेनेचे ४ सदस्य निवडून आले असून तेथे भाजपला आपल्या जागा टिकवून ठेवणे कठीण जाणार आहे. त्यामुळे सेना, राष्ट्रवादी व माकपच्या उमेदवारांना येथे मदत होऊ शकते.पालघरमध्ये सर्वाधिक १७ जागा असून शिवसेनेला आपल्या ८ जागा टिकवून ठेवण्याचे दिव्य पेलावे लागणार आहे. मात्र निष्ठावंताना डावलून बाहेरून आलेल्यांना तिकीट दिल्याने नाराजी आहे. भाजपपुढेही आपल्या ३ जागा टिकवून ठेवण्याचे आव्हान असून भाजपने सेनेचे उमेदवार पाडण्याची विधानसभेत खेळलेली खेळी या निवडणुकीत दोघांना मारक तर ठरणार नाही ना?अशी शक्यताही वर्तवली जात आहे.> प्रतिष्ठेच्या लढतीजिप-तारापूर-प्रकाश निकम(माजी जिप सदस्य व गटनेता)जिप- सफाळे-माजीराज्यमंत्री मनीषा निमकरजिप-जव्हार-माजी अध्यक्ष सुरेखा थेतलेडहाणू-अमिता घोडा (माजी आमदार अमित घोडा ची पत्नी)नंडोरे-देवखोप-नीता पाटील-माजी जिप सदस्यसरावली पस-मेघन पाटील (माजी उपसभापती)सुरेश तरे-माजीसभापती जिल्हापरिषदसलोनी वडे (जिप माजी सभापती अशोक वडे यांची मुलगी)>उमेदवारांना चिंता मतविभागणीचीविक्र मगड : मतदारसंघ पुनर्रचनेनंतर नव्याने अस्तित्वात आलेल्या विक्रमगड मतदारसंघातील ५ गट व १० गणांतील प्रभागामध्ये बदलेल्या राजकीय समीकरणामुळे विक्र मगड पंचायत समिती गड कोण काबीज करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. ८६ हजार १०३ मतदार हक्क बजावणार आहेत. अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या पंचायत समिती मतदारसंघ काबीज करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षासह अपक्षही मोठ्या ताकदीनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे नव्याने निर्माण झालेल्या या प्रभागातील मतदारसंघात शहरी व ग्रामीण अशी मतविभागणी होण्याची चिन्हे दिसत आहेत. प्रामुख्याने भाजप, बहुजन विकास आघाडी, शिवसेना, माकप आणि कॉग्रेस-राष्ट्रवादी व विकास आघाडी एकत्र यांच्यामध्ये खरी लढत अपेक्षित आहे. त्यामुळे पंचायत समितीचा गड कोण काबीज करण्यात यशस्वी ठरणार हे लवकरच स्पष्ट होईल. पंचायत समिती व जिल्हा परिषदेवर भाजपची एक हाती सत्ता होती. मात्र या निवडणुकीमध्ये भाजपविरोधात इतर सर्व पक्ष समोर ठाकले आहे. सद्यस्थितीत जिल्हा परिषद गटासाठी ३२ तर पंचायत समिती गणासाठी ५४ असे एकूण ८६ उमेदवार रिंगणात आहेत.