चैत्र पाडव्याने फुलबाजारात रोजगाराची गुढी
By Admin | Updated: April 8, 2016 01:19 IST2016-04-08T01:19:19+5:302016-04-08T01:19:19+5:30
गुढीपाडवा हा साडेतीन मुहुर्तांपैकी शुभ मुहूर्त असून या दिवशी नवीन कार्यांचा शुभारंभ केला जातो

चैत्र पाडव्याने फुलबाजारात रोजगाराची गुढी
अनिरुद्ध पाटील, बोर्डी
गुढीपाडवा हा साडेतीन मुहुर्तांपैकी शुभ मुहूर्त असून या दिवशी नवीन कार्यांचा शुभारंभ केला जातो. शिवाय कुलदैवतांप्रमाणेच हा सण ज्या वारी आला त्या वाराच्या अधिपतीची पुजा केली जात असल्याने ग्रामीण तसेच शहरी भागात विविध प्रकारची फुल, नारळ, आंबा व कडूलिंबाच्या पानांना विशेष मागणी वाढल्याने डहाणू आणि बोर्डी परिसरातील जनतेसाठी रोजगार निर्माण झाला आहे. चैत्र प्रतिपदा या दिवशी हिंदू धर्मियांच्या नववर्षाला प्रारंभ होत असल्याने ग्रामीण तसेच शहरी भागात आनंद्प्रीत्यार्थ गुढी उभारून गुढीपाडवा साजरा केला जातो. पूर्वी गुढी उभारण्यासाठी चांदीचा कलश व जरी वस्त्र वापरले जायचे. आता वस्त्राच्या ऐवजी भगवा झेंडा बांबूच्या काठीला बांधून, गडू किंवा छोटा तांब्या उपडा ठेवून, त्यावर झेंडूच्या फुलांची भरगच्च माळ लावण्यात येते. हा दिवस साडेतीन मुहूतार्पैकी एक मानला जात असल्याने नवीन वस्तु, सोने व वाहन खरेदी करिता शुभ मानला जातो. व्यापारी वर्गाकडून विधिवत पूजेसह फुलांच्या माळा यांचा वापर केला जातो. विविध मंदिरात दर्शनाकरिता भक्तांची गर्दी दिसून येते.