शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

विरारकरांसाठी असणारे शवागार अनेक महिन्यांपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2019 10:51 PM

नातेवाइकांची होते कुचंबणा; खाजगी रुग्णालयांचा घ्यावा लागतो आधार

वसई : अनेकदा दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या वा इतर कारणास्तव नातेवाईक अंत्यविधिसाठी येण्यासाठी निश्चीत कालावधी नसताना मृतदेह शवागारात ठेवण्याचा पर्याय नातेवाईकांसमोर असतो. मात्र, विरार येथे जिल्हा रूग्णालयाचे एकच शवागार असून ते सुद्धा काही महिन्यापासून नुतनीकरणासाठी बंद असल्यामूळे आता आपत्कालीन स्थितीत मृतदेह ठेवण्यासाठी नातेवाईकांना खाजगी रूग्णालयात धाव घ्यावी लागत आहे.जिल्हा रूग्णालयामार्फत विरार पश्चिमी विराट नगर येथील हिंदू वैकूंठधाम येथे २००६ साली शवागाराची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, गेल्या काही वर्षात या शवागाराच्या विद्यूत यंत्रणेत वारंवार बिघाड होत असल्यामूळे हे शवागार बंद करण्यात आले होते. नविन निविदा मागविल्यानंतर गेल्या तीन महिन्यांपासून या शवागाराचे नव्याने नुतनीकरण सुरू झाले. त्यामूळे जुनी यंत्रणा बाहेर अडगळीत काढण्यात आली आहे. नुतनीकरण सुरू आहे. मात्र, धिम्या गतीने सुरू असल्यामूळे दु:खद प्रसंगी मृतदेह या शवागारात ठेवता येऊ न शकल्यामूळे नाईलाजास्तव खाजगी रूग्णालयातील शवागारात न्यावा लागत आहे.आगस्ट २०१७ ला या शवागाराच्या नुतनीकरणासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. परंतु दीड वर्षे उलटूनही अजून शवागाराची विद्युत यंत्रणा सुरळीत झालेली नाही. या शवागारात अपघाती मृत्यू पावलेले, बेवारस मृतदेह तसेच जवळचे नातेवाईक अंतविधीसाठी येईपर्यंत मृतदेह ठेवण्यासाठी वापर करीत होते. विरारमधील एकमेव जिल्हा रूग्णालयाचे शवागारच बंद असल्यामूळे संजीवनी रूग्णालय विरार किंवा कार्डिनल ग्रेसियस हॉस्पीटल, बंगली येथे मृतदेह शवागारात न्यावे लागत आहेत.महापालिका आयुक्यांची भूमिका...वसई विरार महानगरपालिकेच्या स्थापना होऊन दहा वर्ष होत आली तरी, पालिकेचे स्वत:चे शवागार नसल्यामूळे वसई, विरार व नालासोपाऱ्यात अद्ययावत पालिकेचे शवागार बनविण्यात यांनी अशी मागणी जोर धरत आहे.याबाबत पालिका आयुक्त सतीश लोखंडे यांनी पालिकेचे स्वत:चे शवागार नसले तरी जिल्हा रूग्णालयाला याबाबत लागेल ती मदत शवागारासाठी पालिका देत असल्याचे सांगीतले. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याचे अधिकार जिल्हा रूग्णालयाला असल्यामूळे आपण फक्त त्यांना मदत पूरवू शकतो, हे शवागार पालिकेकडे देण्यात यावे असा प्रस्तावही पाठविल्याचे त्यांनी सांगीतले.विराट नगर स्मशानभूमीत एकमेव शवागार आहे. तेही नुतनीकरणाच्या नावाखाली बंद आहे. हे काम लवकरात लवकर करण्यात यावे. दु:खद प्रसंगी नागरिकांना खाजगी रूग्णालयात धाव घेत शवागारात मृतदेह ठेवावे लागत आहेत.- अभिजीत चौधरी,सामाजीक कार्यकर्ते, विरारमहानगरपालिकेचे स्वत:चे शवागार नसले तरी जिल्हा रूग्णालयाच्या शवागारासाठी लागेल ती मदत प्रशासन वेळोवेळी देत असते. हे शवागार पालिकेकडे देण्यात यावे असा प्रस्ताव पाठवला आहे.- सतीष लोखंडे, आयुक्त, वसई विरार महापालिका

टॅग्स :Vasai Virarवसई विरार