सण, उत्सव शांततेत पार पाडा!
By Admin | Updated: August 22, 2015 22:16 IST2015-08-22T22:16:39+5:302015-08-22T22:16:39+5:30
आगामी येणाऱ्या रक्षाबंधन, गोकुळाष्टमीख दहीहंडी , गणेशोत्सव आणि बकरी ईदसारख्या सण उत्सवानिमित्ताने हिंदु-मुस्लीम बांधवांनी सर्वधर्माचा आदर सन्मान ठेवून

सण, उत्सव शांततेत पार पाडा!
डहाणू : आगामी येणाऱ्या रक्षाबंधन, गोकुळाष्टमीख दहीहंडी , गणेशोत्सव आणि बकरी ईदसारख्या सण उत्सवानिमित्ताने हिंदु-मुस्लीम बांधवांनी सर्वधर्माचा आदर सन्मान ठेवून आपल्याकडून कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत अशी खबरदारी घ्यावी असे आवाहन पालघर जिल्हा पोलीस अधिक्षिका शारदा राऊत यांनी केले.
आज डहाणू पोलीसांनी डहाणू मसोली येथील दशाश्री माळी सभागृहात आगामी सण, उत्सव, शांततेत पार पाडण्यासाठी नागरीकांची सभा आयोजित केली होती. यावेळी पोलीस अधिक्षिका शारदा राऊत यांनी मार्गदर्शन केले. या सभेत अतिरीक्त पोलीस अधिक्षक बी. यशोद, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन पांडकर, पोलीस निरिक्षक उत्तम सोनावणे, अरूण फेगडे, नगराध्यक्ष रमीला पाटील, उपनगराध्यक्ष प्रदीप चाफेकर, माजी नगराध्यक्ष राजेश पारेख, मिहिर शाह, नगरसेवक शमी पीरा, मौलाना दिलशाद शेख, सामाजिक कार्यकर्ते दिनेश रॉय, सलीम शेख, मिनू ईराणी, आणि डहाणू, घोलवड, कासा, वानगाव, पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या शांतता समिती गणेशोत्सव मंडळे, तंटामुक्त गाव समिती, मोहोल्ला समिती, पोलीस अधिकारी, सरपंच, उपसरपंच, नगरसेवक उपस्थित होते.