खड्डे बुजवून केली दिवाळी साजरी; देवळी गावातील तरुणांचा स्तुत्य उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 11:29 PM2019-10-31T23:29:19+5:302019-10-31T23:30:00+5:30

प्रशासनाकडून दखल नाही

Celebrate Diwali celebrated with pits; Honorable activities of the youth of Deoli village | खड्डे बुजवून केली दिवाळी साजरी; देवळी गावातील तरुणांचा स्तुत्य उपक्रम

खड्डे बुजवून केली दिवाळी साजरी; देवळी गावातील तरुणांचा स्तुत्य उपक्रम

Next

वाडा : दिवाळीनिमित्त गोडधोड पदार्थांचा आस्वाद घेत अनेकजण दिवाळी साजरा करतात तर काहीजण फटाके फोडून आनंद व्यक्त करतात. मात्र, वाडा तालुक्यातील देवळी गावातील पंचीवसहून अधिक तरुणांनी दिवाळीच्या दिवशी घमेले, फावडे आणि कुदळ हाती घेऊन रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचा उपक्रम राबवला आहे.

वाडा - मलवाडा - जव्हार हा महत्त्वाचा राज्यमार्ग देवळी गावालगत जातो. या मार्गावर देवळी गावानजीक अनेक खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांबाबत येथील ग्रामस्थांनी अनेकदा वाडा सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडे तक्र ारी केल्या आहेत. पण त्यांच्या तक्र ारींची दखल घेतली गेली नाही.

गावालगत रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यातून वाहनचालकांना करावी लागणारी रोजची कसरत पाहून येथील तरु णांनी श्रमदान करून हे खड्डे बुजविण्याचा निर्णय घेतला. आणि त्यासाठी दिवाळीच्या मुहूर्त ठरवण्यात आला. गावाबाहेर तसेच गावातील अनेक तरु ण एकत्र आले आणि कुदळ, फावडे हाती घेऊन श्रमदानाने या रस्त्यावरील खड्डे भरले.

Web Title: Celebrate Diwali celebrated with pits; Honorable activities of the youth of Deoli village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Diwaliदिवाळी