शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मंडपात पत्त्यांचा डाव, पोलिस व्हॅनच्या आवाजाने पळताना तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2023 09:48 IST

वसई-विरार शहरात गौरी - गणपती उत्सवात रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त

लोकमत न्यूज नेटवर्कविरार/नालासोपारा : विरार पश्चिमेकडील आगाशी कोल्हापूर येथील गणेश मंडपात शुक्रवारी रात्री उशिरा पत्ते खेळत असताना पोलिसांच्या वाहनाचा आवाज ऐकून घाबरून पळ काढणाऱ्या तरुणाचा पडल्याने हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. प्रचित विनोद भोईर (वय १८) असे या तरुणाचे नाव असून, त्याला तत्काळ प्राथमिक उपचारांसाठी संजीवनी रुग्णालयात आणले होते. मात्र, डॉक्टरांनी तपासून  त्याला मृत घोषित केले. यानंतर संपूर्ण गावकऱ्यांनी संजीवनी रुग्णालयाला घेराव घालत आपला आक्रोश व्यक्त केला.

वसई-विरार शहरात गौरी गणपती मंडळांना रात्रीच्या वेळी गस्त घालून मंडपात बसलेल्या पदाधिकाऱ्यांना सतर्क राहावे अशा सूचना देत असतात. यातच विरार पश्चिमेकडील आगाशीजवळील कोल्हापूर गौरी मंडळात शुक्रवारी पोलिस भेट देण्यास गेले होते. त्या मंडपात काही मुले पत्त्याचा डाव खेळत होते. पोलिसांच्या वाहनाचा आवाज ऐकताच त्यांनी तेथून पळ काढला.  आम्ही मंडपावर छापा घातला नाही. रात्रीच्या पोलीसांचे गस्तीचे वाहन तेथून जात होते. भीतीने मुले पळाली आणि त्यात या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे अर्नाळ्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे यांनी सांगितले.

रात्री रुग्णालयात गर्दीआगाशी गावातील लोकांनी रात्री उशिरापर्यंत रुग्णालयात गर्दी केली होती. याची माहिती मिळताच मीरा-भाईंदर आणि वसई-विरार पोलिस फौजफाट्यासह पोहोचून गर्दी नियंत्रित केली. प्रचित हा तरुण अभियंता होण्याचे शिक्षण घेत असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांची गाडी बघून मुलांनी पळ काढला आणि पळत असताना प्रचित पडला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीVasai Virarवसई विरारPoliceपोलिस