वसईत काँग्रेसचे पर्दाफाश आंदोलन
By Admin | Updated: August 26, 2015 23:47 IST2015-08-26T23:47:56+5:302015-08-26T23:47:56+5:30
केंद्र व राज्य सरकारची अकार्यक्षमता, महागाईवाढ, अन्नधान्य वितरण व्यवस्थेतील गोंधळ यांच्या निषेधार्थ बुधवारी वसई-विरार जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे तहसीलदार कार्यालयावर

वसईत काँग्रेसचे पर्दाफाश आंदोलन
वसई : केंद्र व राज्य सरकारची अकार्यक्षमता, महागाईवाढ, अन्नधान्य वितरण व्यवस्थेतील गोंधळ यांच्या निषेधार्थ बुधवारी वसई-विरार जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे तहसीलदार कार्यालयावर पर्दाफाश आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित व जिल्हाध्यक्ष दत्ता नर यांनी केले. या आंदोलनानंतर नायब तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
कांद्याच्या दरातील वाढ, वितरण व्यवस्थेतील गोंधळ व सर्व स्तरांवर अपयशी ठरल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने राज्यभर पर्दाफाश आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, काँगे्रस कार्यकर्त्यांनी वसई तहसीलदार कार्यालयाच्या आवारात हे आंदोलन करण्यात आले. सुमारे तासभर आंदोलन झाल्यानंतर पदाधिकाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. (प्रतिनिधी)