शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सेंच्युरी प्लाय कंपनीचा मालक असल्याचे भासवून, व्यापाऱ्याची ५० लाखांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 10:33 IST

तीन आरोपींना नालासोपाऱ्यातून अटक...

मंगेश कराळे -नालासोपारा - सेंचुरी प्लाय कंपनीचा मालक असल्याचे सांगून कोलकाता येथील एका अंगडिया व्यापाऱ्याला १ मार्चला ५० लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांना अटक करण्यात यश मिळवले आहे. या प्रकरणात फसवणूक करणाऱ्या तीन आरोपींना नालासोपारा शहरातून अटक करत त्यांना कोलकाता पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती सपोनी व जनसंपर्क अधिकारी शिवकुमार गायकवाड यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ मार्चला एका आरोपीने कोलकत्ताच्या सिलीगुडी येथील डॉ. अग्रवाल यांना व्हाट्सऍपवर फोन केला. त्यांच्या परिचयातील सेंचुरी प्लाय कंपनीचे मालक भजनका बोलत असल्याचे भासवून त्यांच्या वडिलांमार्फत ५० लाख रुपये घेतले. अग्रवाल यांची पैशाची फसवणूक झाल्याने ४ मार्चला कोलकत्ताच्या पार्क स्ट्रीट पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ६१(२), ३१८(४), ३३६(३), ३३८, ३४०(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी कोलकाता येथील पोलिस पथक १२ मार्चला पोलिस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे यांची भेट घेऊन माहिती दिली.  

दरम्यान, पोलिस उपायुक्त (गुन्हे) आणि सहाय्यक पोलिस आयुक्त (गुन्हे) यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले. त्यांनी गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे पोलिस निरीक्षक शाहूराज रणवरे यांना गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान मिळालेल्या तांत्रिक विश्लेषण आणि माहितीच्या आधारे आरोपी सैयद काझी (३६), मोहम्मद जावेद चांदीवाला (२८) आणि सचिन आर्यभट (३२) या तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन गुन्ह्यासंदर्भात चौकशी करण्यात आली आणि ते गुन्ह्यात सहभागी असल्याचे आढळून आले. अधिक तपासासाठी तिन्ही आरोपींना कोलकत्ताचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप दत्ता आणि त्यांच्या टीमकडे देण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसbusinessव्यवसाय