एडवणमध्ये शाळेचे तीन वर्ग भस्मसात
By Admin | Updated: December 13, 2015 00:05 IST2015-12-13T00:05:29+5:302015-12-13T00:05:29+5:30
एडवण येथील आदर्श शिक्षण संस्थेच्या विद्याभवन हायस्कूलला आज संध्याकाळी शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीमध्ये तीन वर्ग भस्मसात झाले असून पसरणारी आग

एडवणमध्ये शाळेचे तीन वर्ग भस्मसात
पालघर : एडवण येथील आदर्श शिक्षण संस्थेच्या विद्याभवन हायस्कूलला आज संध्याकाळी शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीमध्ये तीन वर्ग भस्मसात झाले असून पसरणारी आग स्थानिक तरूणांनी आटोक्यात आणल्याने वित्तहानी टळली. आज शनिवार असल्याने शाळा लवकर सुटल्याने विद्यार्थी या अपघातामधून बचावले असले तरी शाळेचे मोठे नुकसान झाले आहे.
सफाळे जवळील एडवण येथे विद्याभवन हायस्कूल ही इंग्रजी माध्यमाची शाळा असून २२५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर त्या शाळेच्या इमारतीला लागूनच लीलाबाई धरमचंद खंडेलवाल वाणिज्य व कनिष्ठ महाविद्यालय आहे. आज संध्याकाळी ४.३० ते ५ वा. च्या सुमारास विद्याभवन शाळेच्या कॉन्फरन्स रूममधून धूर यायला सुरूवात झाल्याने उपस्थित माजी सभापती प्रभाकर ठाकूर, कोरेचे सरपंच आशिष पुरंदरे, तुषार ठाकूर, दिपेश ठाकूर, शैलेश पाटील, योगेश, प्रविण सोलंकी, निकेत ठाकूर, अरविंद पाटील इ. सह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शाळेकडे धाव घेतली. तरूणांनी कनिष्ठ महाविद्यालयातील वर्गखोल्यामधील बँचेस, कॉम्प्युटर इ. साहित्य बाहेर काढले. मात्र विद्याभवन शाळेत लाकडी साहित्य असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. पालघर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला मोठ्या अंतरामुळे उशीर झाला.